HSC Exam 2024 : बारावीची लेखी परीक्षा उद्यापासून! विभागातून 1 लाख 68 हजार 636 विद्यार्थी देणार परीक्षा

HSC Exam 2024 : इयत्ता बारावीच्‍या लेखी परीक्षेला बुधवार (ता.२१) पासून सुरवात होत आहे. या परीक्षेसाठी नाशिकसह धुळे, जळगाव, व नंदुरबार अशा चार जिल्ह्यातून एकूण एक लाख ६८ हजार ६३६ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत.
HSC Exam
HSC Exam esakal
Updated on

Nashik News : इयत्ता बारावीच्‍या लेखी परीक्षेला बुधवार (ता.२१) पासून सुरवात होत आहे. या परीक्षेसाठी नाशिकसह धुळे, जळगाव, व नंदुरबार अशा चार जिल्ह्यातून एकूण एक लाख ६८ हजार ६३६ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. एकीकडे विद्यार्थी अभ्यासात दंग झालेले असताना, दुसरीकडे शिक्षण मंडळाकडून परीक्षा संयोजनांची तयारी पूर्ण झालेली आहे. (written examination of class XII is starting from tomorrow)

महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्‍या नाशिक विभागीय मंडळातर्फे विभागात बारावीच्‍या परीक्षेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना त्‍यांचे करिअर घडविण्यासाठी सद्यःस्‍थितीत इयत्ता बारावी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

या परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे उच्च शिक्षणासाठी नामांकित संस्‍थांचे दारे खुली होत असल्‍याने चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थी परीश्रम घेताना दिसत आहेत. कला, वाणिज्‍य व विज्ञान अशा तिन्‍ही शाखांतील विद्यार्थी या लेखी परीक्षेला सामोरे जातील.

पहिल्‍या टप्यांत भाषा विषयांचे पेपर पार पडणार असून, इंग्रजी या भाषा विषयाच्‍या पेपरने बारावीच्‍या परीक्षेला सुरवात होणार आहे. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये परीक्षांचे आयोजन केले आहे.

पथकांची असणार करडी नजर

परीक्षा केंद्रांना आवश्‍यक सूचना दिल्‍या असून गैरप्रकार रोखण्यासाठी पथकांची नियुक्‍ती केलेली आहे. या पथकांकडून विविध केंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः संवेदनशील परीक्षा केंद्रांवर पथकांची करडी नजर राहणार आहे.

HSC Exam
SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर, बससेवा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान

इयत्ता बारावीच्‍या परीक्षेची विभागाची स्‍थिती अशी-

जिल्‍हा विज्ञान वाणिज्‍य कला

नाशिक ४०,२५८ १२,३२९ २४,१७१

जळगाव २५,३१२ ५,१२६ १६,२४४

धुळे १४,२७७ ८,१३८ १,२७९

नंदुरबार १०,०४५ ८१५ ६,५१७

कुठलीही मदत हवीये.. करा येथे संपर्क..

विद्यार्थी, पालक, शाळा-कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख व परीक्षा प्रक्रियेतील इतर घटकांना कुठल्‍याही स्वरूपाच्या अडीअडचणींमध्ये सहाय्यता करण्यासाठी मदत सहाय्यता क्रमांक जाहीर केलेला आहे. परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, ऐनवेळी अपघात झाल्‍यास अशा स्‍थितीत करावयाची कारवाई,

आउट ऑफ टर्न, प्रात्‍यक्षिक परीक्षा, नैसर्गिक किंवा आपत्कालीन प्रसंगी या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. परीक्षा कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत क्रमांक सक्रिय राहील. नियंत्रण समिती क्रमांक-१ मध्ये विभागीय सहसचिव एम. व्‍ही. कदम (९२७००७१७६१).

HSC Exam
SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर, बससेवा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान

वरिष्ठ अधीक्षक एच. डी. बच्‍छाव (८६०५४०९८७१), सहाय्यक अधीक्षक के. एस. गांगोडे (९१४६५४१७७३), वरिष्ठ लिपिक आर. आर. आव्‍हाड (९४२१५५८२३०) यांच्‍याशी किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर ०२५३-२९५०४१० या क्रमांकाशी संपर्क साधता येईल.

तसेच नियंत्रण समिती क्रमांक-२ मध्ये विभागीय सहाय्यक सचिव मंदाकिनी देवकर (८८८८३३९४२३), वरिष्ठ अधीक्षक एस. एम. कापसे (९९२१३९०६१३), सहाय्यक अधीक्षक व्‍ही. एच. मोरे (९४२३६९२६३९), वरिष्ठ लिपिक एम. आर. गायकवाड (९३२२२९३१८३) यांच्‍याशी किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर ०२५३-२९४५२४१, २९४५२५१ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

दडपण-तणाव घेऊ नका, समुपदेशकांना संपर्क साधा..

परीक्षा कालावधीत येणारा ताणतणाव घालविण्यासाठी समुपदेशकांची नियुक्‍ती केली आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या जिल्‍ह्‍यातील समुपदेशकांशी संपर्क साधत मार्गदर्शन प्राप्त करून घेता येणार आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी किरण बावा (९४२३१८४१४१), अरुण जायभावे (८६६८५७९०९७), धुळेसाठी नंदकिशोर बागूल (९४२०८५२५३१), शांताराम पाटील (९४२१५३७३२३), जळगावसाठी सुरेश सुरवाडे (७२१८२१४४७७), प्रमोदिनी पाटील (९४०४५९४१८६), नंदुरबारसाठी राजेंद्र माळी (९४०४७४९८००), अशोक महाले (९४२१६१८१३०) यांना संपर्क साधता येईल.

HSC Exam
HSC Exam 2024 : बाभूळगाव केंद्राची बारावीची आसन व्यवस्था; भाटगावसह येवल्यातील विद्यार्थी देणार परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.