Nashik News : चांदशी (ता. नाशिक) येथील एबेनेझर इंटरनॅशनल स्कूलने बेकायदेशीरपणे एका शैक्षणिक वर्षात २७ टक्के शुल्क वाढविली. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले. तसेच शाळा स्थानिक प्राधिकरणास सहकार्य करत नाही.
त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळेला दिलेली संलग्नता रद्द करण्याची शिफारस प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी केली आहे. यासंदर्भात सीबीएसईच्या सचिवांना पत्र पाठविले आहे. (Education officials letter to CBSE canceling Ebenezer affiliation)