Nashik Educational: पाचवी अन् आठवीच्या वार्षिक परीक्षेसाठी 60 गुणांची परीक्षा! अनुत्तीर्ण झाल्यास पुन्हा त्याच वर्गात

Girl and Boy Reading
Girl and Boy Readingesakal
Updated on

बिजोरसे : पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तोंडी-प्रात्यक्षिक, लेखी स्वरूपाच्या वार्षिक परीक्षेचे स्वरूप निश्‍चित करण्यात आले.

परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेतली जाईल. त्यातही अनुत्तीर्ण झाल्यास संबंधित विद्यार्थ्याला त्याच वर्गात ठेवले जाईल. हा बदल २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षांपासून करण्यात आला. दोन्ही वर्गासाठी प्रत्येक विषयासाठी ५० ते ६० गुणांची परीक्षा होईल. (Nashik Educational 60 Marks Exam for 5th and 8th Annual Exam class)

भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयाची परीक्षा घेतली जाईल. कला, कार्यानुभव आदी इतर विषयांसाठी सध्याचे प्रचलित आकारिक मूल्यमापन केले जाईल.

पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेच्या आयोजन दुसऱ्या सत्राच्या अखेरीस म्हणजे, एप्रिलमध्ये होईल. इतर वर्गांच्यासोबत निकाल जाहीर होईल. परीक्षेत किमान ३५ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतील.

२०१० पासून शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार एकच एक वार्षिक परीक्षेनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धती बंद करण्यात आली.

मात्र पालकांच्या आग्रह आणि विद्यार्थी गुणवत्तेत मागे राहतात, अशी सर्वत्र ओरड होऊ लागल्याने पाचवी आणि आठवीसाठी पुन्हा वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला.

Girl and Boy Reading
Rajya Natya Spardha: स्वतःचा शोध घेणारा 'आपुलाची वाद आपणासी'

पुनर्परीक्षा मूळ परीक्षेनुसार

परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण दिले जातील. मात्र तरीही एक अथवा एकाहून अधिक विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन केले जाईल.

पुनर्परीक्षा मूळ परीक्षेनुसार असेल. तसेच पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना समकक्ष वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीत प्रवेश द्यायचा असल्यास पाचवीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

Girl and Boy Reading
Onion Export Ban: कांदाप्रश्‍नी सत्ताधाऱ्यांची आगामी निवडणुकांत कसोटी! निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.