नाशिक : औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे. शैक्षणिक वर्ष संपायला अवघे काही महिने उरले असताना, अद्याप प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आचारसंहितेमुळे शासन निर्णय निर्गमित होऊ शकणार नसल्याने आता निवडणूक निकालानंतरच पुन्हा प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. (Educational losses due to delays in pharmacy admissions stuck due assembly election )