नाशिक : मालमत्ता करावरील थकबाकीवर महापालिकेकडून दंडात्मक आकारणी रद्द करण्यात आली असून, शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे. जानेवारी २०२५ पर्यंत ही योजना लागू राहणार आहे. जीएसटी अनुदानापाठोपाठ महापालिकेला मालमत्ता करातून अधिक उत्पन्न प्राप्त होते. मालमत्ता कराचे दरवर्षी उद्दिष्ट निश्चित केले जाते. मात्र शंभर टक्के उद्दिष्ट गाठणे शक्य होत नाही. (Efforts to implement penalty waiver scheme for citizens to collect 100% tax )
मनुष्यबळामुळे ग्राहकांपर्यंत देयके पोचत नाहीत. त्यामुळे महापालिकेने २०१६ पासून त्रैमासिक कर सवलत योजना लागू केली आहे. एप्रिल महिन्यात एकरकमी मालमत्ता कर अदा केल्यास आठ टक्के कर सवलत आहे. तर मे महिन्यात पाच व जून महिन्यात तीन टक्के कर सवलत आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या साधनांचा वापर केल्यास त्यावरदेखील एक टक्का सवलत दिली जाते. ऑनलाइन कर अदा करणाऱ्यांनादेखील एक टक्का सवलत दिली जाते. जून महिन्यात करसवलतींचा कालावधी संपुष्टात आला. (latest marathi news)
त्यामुळे महापालिकेने शंभर टक्के करवसुली करण्यासाठी मालमत्ता कराच्या थकबाकीवरील दोन टक्के शास्ती माफ करण्यासाठी नवीन योजना लागू केली आहे. महापालिका हद्दीमध्ये जवळपास सव्वादोन लाख थकबाकीदार आहे. योजनेमध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात शास्तीची पाच टक्के रक्कम अदा केल्यास ९५ टक्के माफी आहे. डिसेंबर महिन्यात माफीची रक्कम पंधरा टक्के अदा केल्यास ८५ टक्के माफी आहे, तर जानेवारी २०२५ मध्ये २५ टक्के माफीची रक्कम अदा केल्यास ७५ टक्के शास्ती माफी, असे योजनेचे स्वरूप आहे.
विभागनिहाय ग्राहक व शास्तीची रक्कम (कोटीत)
पूर्व ५८,८९२ - ६५.२३
नाशिक रोड ४९,१२८- ५०.११
पश्चिम २०,२४७- २५.३९
सिडको ८९,४९८- ३०.०४
पंचवटी ९५,५११- ८०.२७
एकूण ३,६४,२३०- २७२.५८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.