Nashik News : ई मुलाखतमुळे स्क्रीनवर भेटणे झाले सोपे! मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी सुविधा

Nashik News : मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांसाठी कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी ई मुलाखत (व्हिडिओ कॉन्फरन्स) कार्यान्वित झाल्यामुळे स्क्रीनवर भेटणे सोपे झाले आहे.
nashik Central Jail
nashik Central Jailesakal
Updated on

नाशिक : मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांसाठी कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी ई मुलाखत (व्हिडिओ कॉन्फरन्स) कार्यान्वित झाल्यामुळे स्क्रीनवर भेटणे सोपे झाले आहे. याचबरोबर खटले चालू असताना न्यायालयात कैदी ने-आण करण्यासाठी होणारी कारागृह व पोलिस प्रशासनाची धावपळ काही प्रमाणात थांबली आहे. (Nashik Facilities for families of prisoners in Central Jails marathi news)

नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये नाशिकसह राज्यातीलच नव्हे तर देशविदेशातील कैदी आहेत. कैद्यांना रक्तातील नातेवाइकांना कारागृह प्रशासनाच्या निर्देशित नियमांप्रमाणे भेटण्याचा अधिकार आहे. त्यांना कारागृहात येऊन सकाळी नाव नोंदवून रांगेत उभे राहून भेटावे लागत असे. यासाठी प्रचंड वेळ जात असे.

बंदी कैद्यांना भेटणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे कारागृह प्रशासनावरही प्रचंड ताण वाढत असे. नातेवाइकांना दुरून प्रवास करून यावे लागत असे. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भेट होत असल्यामुळे किमान प्रत्यक्ष नाही तर स्क्रीनवर तरी आपल्या व्यक्तीची भेट सुखद अनुभव व समाधान त्यांना देत आहे.

कारागृह प्रशासनाचा कार्यालयीन ताणही यामुळे काही प्रमाणात कमी झालेला आहे. तसेच नातेवाइकांना किंवा बाहेर संवादासाठी जे गैरमार्ग कैद्यांमार्फत अवलंबिले जायचे त्यावरही आळा बसला आहे. तसेच खटले चालू असताना कैद्यांची ने-आण करण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त पुरवला जातो.

मात्र जर कर्मचारी उपलब्ध नसले तर कैद्यांना पुढच्या तारखेला हजर केले जायचे. त्यामुळे त्यांची सुनावणी वेळेत होत नसायची. न्यायालयीन विलंबामुळे अधिक कालावधी तुरुंगातच राहावं लागत असे. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आता सुनावणी होत असल्यामुळे व त्यासाठी लागणाऱ्या संगणकांची संख्या वाढविल्यामुळे सुनावणीही लवकर होत आहे.

nashik Central Jail
Nashik Police Transfer: सोहन माछरे सातपूरचे ‘प्रभारी’! आयुक्तांची नाराजी भोवली; नलावडेंना झटका

नातेवाइकांची फरपट थांबली

सरकारी कुठलीही काम म्हटले की वेळ जातो. तासनतास ताटकळत रांगेत उभे राहणे, अर्ज, कागदपत्रांची पूर्तता या बाबींचा अनुभव आपल्याला नियमितपणे अनुभव येतो. साधे सरळ काम करण्यासाठी शासकीय कुठल्याही कार्यालयात तासनतास वेळ वाया जात असेल.

तर कारागृहातील बंदी कैद्यांना भेटण्यासाठी किती वेळ लागू शकतो यावरून आपल्याला अंदाज येईलच. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा बंदी कैद्यांना रक्तातील नातेवाइकांशी संवाद साधता आल्यामुळे नातेवाइकांची होणारी फरपट थांबली आहे.

"नियमांच्या अधीन राहून बंदी कैद्यांना रक्तातील नातेवाइकांना भेटण्याचा अधिकार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ई मुलाखतीच्या दरम्यान कारागृहाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली स्क्रीनवर भेट घडवून दिली जाते. स्क्रीनवर भेट होत असल्यामुळे निश्चितच नातेवाईक व कैदी समाधानी आहेत आहेत."-अरुणा मुगुटराव, कारागृह अधीक्षक, नाशिक मध्यवर्ती कारागृह

nashik Central Jail
Nashik Police: शहरातील सराईतांना ‘हद्दपारी’चा दणका! पोलिस आयुक्त आक्रमक; साडेतेरा महिन्यात 150 गुन्हेगारांवर कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.