नाशिक : भारतीय जनता पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे हे पक्षाचे पदाधिकारी नसल्याने उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकारी मेळाव्याला ते येणे अपेक्षित नाही. जे पदाधिकारी आहेत, त्यांनाच बोलाविण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या तयारीसंदर्भात दानवे शनिवारी (ता. २१) नाशिकमध्ये आले होते. (Eknath Khadse no entry for now explanation of demons from entry in divisional meeting )
या वेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याचा पहिला टप्पा गृहमंत्री शहा यांच्या नाशिक दौर्याने सुरू होईल. त्यानंतर दुसरा टप्पा कोल्हापूरमध्ये होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहा मार्गदर्शन करतील. उत्तर महाराष्ट्राच्या मेळाव्यासाठी एकनाथ खडसे यांनी बैठकीला येणे अपेक्षित नाही. खडसे हे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. जे पदाधिकारी आहेत, त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. साधारण ९०० पदाधिकारी उपस्थित राहतील. खडसे यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे निकाल लागणार नाही. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात ते म्हणाले, की मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे, ही आमची भूमिका होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात त्यांना आरक्षण टिकविता आले नाही. ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका आहे. (latest marathi news)
महाविकास आघाडीचे नेते मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट भूमिका मांडत नाहीत, यावरूनच त्यांचे राजकारण स्पष्ट होते. आपली भूमिका स्पष्ट करण्याबरोबरच आघाडीने निवडणुकीच्या जाहीरमान्यातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ असे सांगावे, असे आव्हान दानवे यांनी आघाडीच्या नेत्यांना दिले. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, ज्येष्ठ नेते विजय साने, शहर सरचिटणीस सुनील केदार, ॲड. श्याम बडोदे, रोहिणी नायडू, माजी आमदार बाळासाहेब सानप, अनिल भालेराव आदी उपस्थित होते.
तीन पक्षांत मतभेद होणारच
महायुतीत तीन घटक पक्ष असल्याने महायुतीतील घटक पक्षांच्या प्रत्येक नेते व लोकप्रतिनिधींमध्ये सर्वच मुद्यांविषयी एकमत होईलच, असे नाही. आमदार नीतेश राणे यांच्याकडून सुरू असलेल्या वक्तव्याबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, असे सांगताना त्यावर अधिक बोलणे दानवे यांनी टाळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.