Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी!

Nashik News : चिंचविहीर (ता.नांदगाव) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात विक्रम भागवत दाणेकर (वय ६०) हे शेतकरी जखमी झाले.
Leopard Attack
Leopard Attack Sakal
Updated on

Nashik News : चिंचविहीर (ता.नांदगाव) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात विक्रम भागवत दाणेकर (वय ६०) हे शेतकरी जखमी झाले. गेल्या महिन्यापासून बिबट्या या परिसरात ठाण मांडून बसला असल्याच्या तक्रारी होत्या वनविभागाने पिंजरा लावला होता मात्र पिंजऱ्यात बिबट्या काही गवसला नाही, याउलट बिबट्याने दोन हरिण, चार कुत्रे, शेळ्या. (Elderly injured in leopard attack)

वासरू, गाय, अन चक्क पिंजऱ्यात ठेवलेला बोकड फस्त केल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी दिली. आज (बुधवारी) सांयकाळी दाणेकर हे विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले असता विहिरीजवळच्या मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला चढविला या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विक्रम दाणेकर यांनी आरडाओरड केल्यावर आजूबाजूचे लोक मदतीला धावून आल्याने ते थोडक्यात बचावले.

जखमी अवस्थेतल्या विक्रम दाणेकर याना नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. डॉ. शांताराम राठोड यांनी उपचार केले. गळ्याला व पाठीला बिबट्याचे नख लागल्याचे निदान डॉक्टरांनी केले. जखमी शेतकऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (latest marathi news)

Leopard Attack
Nashik News : वणीकर डासांसह दुर्गंधीने त्रस्त! तुंबलेल्या गटारींमुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना निमंत्रण

हल्ल्यानंतर सदरचा बिबट्या अजूनही जाधववस्ती, नवलेवस्ती परिसरात दबा धरून असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. विशेष म्हणजे चिंचविहीर परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला सापळ्यात अडकविण्यासाठी लावण्यात आलेला पिंजरा घटनेच्या अगोदर दोन तासापूर्वी बिबट्या येत नाही म्हणून हलविण्यात आला.

त्यानंतर सांयकाळी हल्ल्याची ही घटना घडली. दरम्यान घाटमाथ्यावर गेल्या चार दिवसापूर्वी लोढरे शिवारात मादी बिबट्याचा बछड्यासह वावर असल्याचे दिसून आल्याने पिंजरा लावण्यात आला

Leopard Attack
Nashik Police : ‘रॅश-ड्रायव्हिंग’, ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाईचा बडगा! शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.