इच्छुकांमुळे बंडखोरीची अधिक भीती

नागरिक ठरविणार प्रभागाचे भवितव्य
nashik election Citizens decide future of the ward 39
nashik election Citizens decide future of the ward 39sakal
Updated on

नाशिक : सध्याच्या प्रभाग क्रमांक ३० आणि ३१ च्या विभाजनातून नवीन प्रभाग क्रमांक ३९ ची निर्मिती झाली आहे. मूळ इंदिरानगरचा बापू बंगला, गजानन महाराज मंदिर, जिल्हा परिषद कॉलनी हा भाजपचा कोअर समजला जाणारा हा परिसर या प्रभागात जोडला गेला आहे. तर, दुसरीकडे प्रभाग ३१ मधील चेतनानगर, किशोरनगर, सदिच्छानगरचा काही भाग, राणेनगर हा भाग या प्रभागाला जोडला गेला आहे.

या भागात असलेली राजीवनगर वसाहत आणि तेथील सुमारे चार हजार मतदार मात्र भाजपसाठी खोडा घालू शकतात. गतवेळीदेखील येथून भाजपला अत्यंत नगण्य मते मिळाली होती. त्यामुळे सध्यातरी प्रभागाचे चित्र समतोल झाल्याचे दिसत आहे. विविध सण आणि उत्सव साजरा करण्यासाठी हा परिसर नेहमीच आघाडीवर असतो. त्यात प्रमुख इच्छुकांचे योगदान असते. त्यामुळे येथील लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या भागात असणारे ज्येष्ठ नागरिक संघ आणि त्यांचे शेकडोंच्या संख्येने असलेले सदस्य निर्णायक भूमिका बजावू शकतात. विविध नागरी सुविधांसोबत सीसीटीव्हीचे जाळे प्रभागात पसरल्याने वरकरणी भाजपवर मतदार खूष असले तरीदेखील सेनेची अनुभवी टीम सर्व ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. मनसेकडूनदेखील निर्मितीसाठी जुळवाजुळव सुरू आहे. अनेक वर्षांपासून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने भाजपमध्ये गूढ वातावरण आहे. बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह इतर पक्ष आणि आघाड्यांमध्ये मात्र सध्या तरी शांतता आहे. इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे संभाव्य बंडखोरी झाली तर मात्र इतर सर्व पक्ष आणि अपक्ष मिळून वेगळे पॅनल देण्याच्या मनःस्थितीत अनेक इच्छुक आहेत.

प्रभागाची व्याप्ती

राणेनगर, चेतनानगर, पाटील बाग, गणेश कॉलनी, सेंट फ्रान्सिस हायस्कूल.

उत्तर : मुंबई- आग्रा महामार्ग क्रमांक तीन, मुरलीधर राधानाथ अपार्टमेंटच्या मागील बाजूने इंदिरानगर पोलिस स्टेशन घेऊन गजरा पार्क इमारतीच्या मागील बाजूने गोदावरी हाईट्स इमारत सोडून गजानन महाराज मंदिर रस्त्यापर्यंत. मोदकेश्वर मंदिर रस्त्याने पूर्वेकडून बापू बंगल्यापर्यंत, बापू बंगल्याच्या पुढे दक्षिणेकडे जाऊन जुको ॲकॅडमीपर्यंत. अंतर्गत रस्त्याने स्वामी समर्थ केंद्रापर्यंत, पुढे अंतर्गत रस्त्याने परबनगर दत्तमंदिर चौकापर्यंत.

पूर्व : परबनगर, दत्त मंदिर चौकापासून दक्षिणेकडे येऊन ३० मीटर वडाळा- सारथी रस्त्यापर्यंत, पुढे पश्चिमेकडून राजसारथी सोसायटीपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून श्रीराम चौकापर्यंत, राणेनगर रस्त्याने १८ मीटर डीपी रस्त्यापर्यंत, पश्चिमेकडून समर्थ अपार्टमेंटपर्यंत.

दक्षिण - सत्यम अपार्टमेंटपासून १८ मीटर डीपी रस्त्याने हॉटेल सेव्हन हेवन समोरील अभिनंदन लॉन्सपर्यंत.

पश्चिम - मुंबई- आग्रा महामार्ग क्रमांक तीनच्या सर्व्हिस रोडवरील अभिनंदन लॉन्सपासून उत्तरेकडे सर्व्हिस रोडने पूर्वेकडील भाग घेऊन मुंबई- आग्रा महामार्ग क्रमांक तीन लगत मोटर्स राधानाथपर्यंत.

हे आहेत इच्छुक

सतीश सोनवणे, अमोल जाधव, ॲड. श्‍याम बडोदे, पुष्पा आव्हाड, संगीता जाधव, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. अजिंक्य साने, अर्चना जाधव, वंदना बिरारी, गोपाळ पाटील, साहेबराव आव्हाड, सागर देशमुख, माणिक मेमाणे, सुरेंद्र कोथमिरे, संजय काळे, निकितेश धाकराव, संजय गायकवाड, निशांत जाधव, राजेश भोसले, अनिता सोनवणे, सोनाली गायकवाड, पल्लवी धाकराव, पूजा देशमुख, स्वप्नाली कोथमिरे, अजय दहिया, महेश कोथमिरे, धीरज बच्छाव, डॉ. पल्लवी जाधव, पद्माकर आहिरे, वाल्मीक घुगे, आकाश कदम, राजश्री शौचे, वैशाली दराडे, दीपक बोरसे, रावसाहेब मकासरे, शोभा दोंदे, सोनाली कुलकर्णी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.