Nashik News : शासनाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मे पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिक जिल्हयातील ३० संस्थांच्या निवडणुका स्थगित होणार आहे. यात ग्रामीण भागातील १५ विविध कार्यकारी सोसायट्यांसह कर्मचारी पतसंस्थांच्या निवडणुकांचा समावेश आहे. दरम्यान ‘ब’ गटातील १७ व तालुकास्तरावरील २६ अशा एकूण ४३ सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. (Nashik Election will be held within stipulated time marathi news)
त्यांच्या निवडणुका ठरल्यावेळात होणार असल्याचे जिल्हा उपनिंबधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. सहकार विभागाकडून निवडणुकांची तयारी सुरू असतानाच देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असल्याने सहकार विभागाने उच्च न्यायालयाने निवडणुकांचे आदेश दिलेल्या निवडणुका वगळून येत्या ३१ मे २०२४ पर्यंत सरसकट सगळया संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे.
नाशिकच्या वनविकास कर्मचारी सहकारी पतसंस्थेसह नांदगाव येथील समृध्दी सहकारी बँक, याशिवाय रोझे व लखाणी (ता. मालेगाव), खामगाव (ता. येवला), मुखेड (ता. येवला), लोखंडेवाडी (ता. दिंडोरी), भादवण (ता. कळवण) येथील विका सोसायटया तसेच रिंग गिअर्स कर्मचारी पतसंस्था मुसळगाव ता. सिन्नर), नाशिक जिल्हा पोलिस को. सोसायटी, एअरफोर्स सेवकांची सोसायटी (देवळाली). (latest marathi news)
रिषभ सेवकांची सहकारी पतसंस्था (सातपूर), महाराष्ट्र समाज सेवा संघ सेवकांची पतपेढी (नाशिक), जिल्हा शासकीय अभियंता पगारदार सहकारी पतसंस्था (नाशिक), वीज कामगार सहकारी पतसंस्था (नाशिक), डेल्टा मॅग्नेटस् कर्मचारी सोसायटी (अंबड, नाशिक) या संस्थांच्या संभाव्य निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झालेली आहे. अंतिम मतदारयादी प्रसिध्द झाली असून त्यांचा निवडणुक कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यांच्या निवडणुका ठरल्यावेळी होणार आहे.
यांचा कार्यक्रम स्थगित
गत आठवडयात जिल्हयातील विविध १५ संस्थांच्या संभाव्य निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती मागविण्याच्या कार्यक्रम घोषित झालेला आहे. या सर्व संस्थांच्या निवडणुका स्थगित राहतील. याशिवाय आगामी होणाऱ्या १५ संस्था अशा ३० संस्थांच्या निवडणुका स्थगित राहणार आहे.
यात प्रामुख्याने लासलगाव तालुका खरेदी-विक्री संघ, नाशिक सहकारी बोर्ड, देना बँक कर्मचारी क्रेडिट सोसायटी (नाशिक), शिवाजीराव अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी सोसायटी, राज्य औद्योगिक विकास महामंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था, नाशिक याशिवाय रायपूर (ता. चांदवड), हिवरखेडे (ता. चांदवड), खडकखांब (ता. चांदवड), गोडेगाव मुखेड (ता. निफाड), वेहेळगाव, मुळडोंगरी (ता. नांदगाव), चिंचोडी खुर्द व पिंप्री, आहुली व कन्होळे (ता. इगतपुरी) आदींचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.