Cooperative Societies Election : जिल्ह्यात 17 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू

Nashik News : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात १७ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी येत्या २१ जुलैला मतदान होणार आहे.
Cooperative Societies Election
Cooperative Societies Election esakal
Updated on

Nashik News : राज्यातील पावसाचा अंदाज तसेच मदत आणि पुनर्वसन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सहकार विभागाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरअखेरपर्यंत पुढे ढकलण्याच्या घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत, ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत घेण्याचे आदेश काढले. (Cooperative Societies Election)

त्यानुसार जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात १७ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी येत्या २१ जुलैला मतदान होणार आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील आठ हजार ३०५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती; परंतु पावसामुळे शेतकऱ्यांना यात सहभागी होता येणार नाही म्हणून राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आली.

या निर्णयाविरोधात दिनकर गावंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असता, त्यावर ज्या टप्प्यावर निवडणुका सुरू झालेल्या आहेत, त्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश खंडपीठाने दिले. त्यामुळे सहकार विभागाने पुन्हा शुद्धीपत्रक काढत ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्या संस्थांच्या निवडणुका ठरल्या वेळेत घ्याव्यात, असे आदेश काढले. जिल्ह्यातील अशा १७ संस्थांसाठी नामनिर्देशनपत्र छाननीपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने, त्यापुढील कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केला. (latest marathi news)

Cooperative Societies Election
Nashik Tax Recovery : कर्जवसुली थांबवा, अन्यथा जनआंदोलन! शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक

या संस्थांच्या आहेत निवडणुका

रोझे विविध कार्यकारी सेवा सोसायटी (ता. मालेगाव), (कै). पुंजाराम मोतीराम हिरे सोसायटी (ता. मालेगाव), खामगाव सोसायटी (ता. येवला), भाग्यलक्ष्मी सोसायटी (ता. येवला), लोखंडेवाडी सोसायटी (ता. दिंडोरी), रिंग गिअर्स एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी (ता. सिन्नर), दादाजी झिप्रू जाधव सोसायटी (ता. कळवण).

नाशिक जिल्हा पोलिस को-ऑप क्रेडिट सोसायटी (नाशिक), २५ ई डी एअरफोर्स सेवकांची सहकारी पतसंस्था (देवळाली), रिषभ इन्स्ट्रूमेंटस सेवकांची सह. पतसंस्था (सातपूर), महाराष्ट्र समाज सेवा संघ सेवकांची पतसंस्था (नाशिक), नाशिक जिल्हा शासकीय अभियंता पगारदार सहकारी पतसंस्था (नाशिक).

राष्ट्रीय वीज कामगार सहकारी पतसंस्था (नाशिक), दि नाशिक पोस्टल को-ऑप क्रेडिट सोसायटी (अंबड), डेल्टा मॅग्नेटस एम्प. को- ऑप क्रेडिट सोसायटी (नाशिक), समृद्धी सहकारी बॅंक (नांदगाव), वनविकास कर्मचारी सहकारी पतसंस्था (नाशिक).

Cooperative Societies Election
Nashik News : मिरची पिकावर घुबड्या रोगाचा प्रादुर्भाव; निफाडच्या पूर्वपट्यात औषध फवारूनही उपयोग होईना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()