Nashik Lok Sabha Election : निवडणूक लोकसभेची, तालिम स्थानिक स्वराज्य संस्थांची

Lok Sabha Election : स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या आहेत.
Lok Sabha Election
Lok Sabha Electionesakal
Updated on

सिन्नर : गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत होते. सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडत होता. या निवडणुकीत काहीजण स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपलाही प्रचार करुन घेतला. (Elections to local bodies stalled for past two years)

स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुकीत उभे राहण्याची तयारी अनेक इच्छुक उमेदवारांनी केली होती. मात्र वारंवार निवडणुका लांबणीवर पडत असल्याने त्यांची निराशा होत होती.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर चर्चा सुरू असतानाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. यामुळे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. या निवडणुकीसाठी प्रचार सभा, बैठका, पदयात्रेत अनेक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सहभाग घेऊन निवडणुकीची कशा पद्धतीने तयारी करावी लागते याचे जणू प्रशिक्षण घेतल्याचे दिसून आले.

लोकसभेच्या निवडणुकीत विविध कामे करून जणू यामुळे त्यांना निवडणुकीचा अनुभव आलेला आहे. याचा उपयोग त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या यंत्रणेत सहभाग घेतल्याने अनेक वरिष्ठ नेत्यांबरोबर अनेकांचे संबंध आले असून त्याचा फायदा त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नक्कीच होणारा आहे. (latest marathi news)

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरीचा निकाल दुपारी बारापर्यंत, नाशिकला चार वाजणार

निवडणुकीची रंगीत तालीम करण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षपणे भाग घेऊन प्रचाराची विविध काम केली. आता लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संधी मिळणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

कोणता झेंडा घेऊ हाती

अनेकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदल केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची यामध्ये खूपच धावपळ उडाली. नेता दुसरीकडे गेल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले. अनेकांनी यामुळे निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केले तर अनेकांना कोणता झेंडा घेऊ हाती अशा पेचेत पडल्याचा प्रत्यय ग्रामीण भागात आला.

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरीचा निकाल दुपारी बारापर्यंत, नाशिकला चार वाजणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.