Nashik News : सिडकोत विद्युत डीपी उघड्यावर; महावितरणकडून डोळेझाक कायम

Nashik : सिडको परिसरात अनेक विद्युतवाहिन्या प्रवाहित करणाऱ्या डीपी उघड्या अवस्थेत दिसून येत आहेत. सिडकोतील कामगार वस्तीमध्ये अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत.
DP covered with tarpaulin in Lakshmi Nagar area of ​​Mahale Form. electric wires coming out from DP in Jai Hind Colony area.
DP covered with tarpaulin in Lakshmi Nagar area of ​​Mahale Form. electric wires coming out from DP in Jai Hind Colony area.esakal
Updated on

नाशिक : सिडको परिसरात अनेक विद्युतवाहिन्या प्रवाहित करणाऱ्या डीपी उघड्या अवस्थेत दिसून येत आहेत. सिडकोतील कामगार वस्तीमध्ये अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांना घरातील वीज वापरासाठी परिसरात महावितरणकडून अनेक ठिकाणी डीपीची सोय जागोजागी केल्याचे दिसते. परंतु बऱ्याच ठिकाणी मोठ्या आकाराच्या डीपीचे दरवाजे निखळून पडल्याचे दिसून येते. आजही अशा अनेक नादुरूस्त स्वरूपातील विद्युत डीपी परिसरात आहेत. अनेकवेळा विजेचा लपंडाव सिडकोमध्ये सुरू असतो, नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सिडको परिसरात जास्त आहे. (electric transmitter is open in cidco ignorance by mseb )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.