सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा
ओझर परिसर : मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर- पिंपळगाव विभाग सहा पदरी झाला. गावांना सर्व्हिस रोडद्वारे जोडले आहे. त्या रस्त्यांवर पथदीप लावले. त्याचे येणारे वीजबिल थकल्याने मुख्य सर्व्हिस रोड सध्या अंधारमय झाला आहे. यामुळे अनेक वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. वीज बचतीसाठी मुद्दाम लाईट बंद ठेवली जाते, असा थेट आरोप वाहनधारकांनी केला आहे. (Nashik Electricity bill of highway authority exhausted Due to lack of facilities lives of motorists at risk marathi news)
राष्ट्रीय महामार्गावरील ओझर विभाग प्रचंड वर्दळीचा आहे. ओझर शहर, उपनगरे, एचएएल वसाहत, एअरफोर्स आणि पिंपळगाव व नाशिकहून येणाऱ्या वाहनधारकांना सायंकाळी सर्व्हिस रोडवरचा प्रवास अंधारमय होत आहे. याची सखोल चौकशी केली असता, प्राधिकरणाने वीजबिल थकविल्याची धक्कादायक बाब समोर आली.
महामार्गावर आधीच अनेक सुविधांची वणवा आहे. त्यात थकीत वीजबिलामुळे बत्ती गुलची साडेसाती लागल्याचे समोर आले. ही गंभीर बाब असताना, सुरू असलेली अनियमितता किती लोकांच्या जीवावर बेतणार, याचा हिशोब न केलेला बरा.
अनेक वर्षांपासून ठिकठिकाणच्या हायमास्ट, पथदीप आणि रस्त्यांच्या दर्जाबाबत चर्चा सुरू आहे. सर्व्हिस रोडवरील पथदीव्यांचे राजकारण कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे आणि पथदीप सायंकाळनंतर सुरूच राहिले पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. (latest marathi news)
कमी अंतरासाठी सर्वाधिक टोल आकारणी पिंपळगाव टोल नाक्यावर वसूल केली जाते. बाहेरच्या वाहनधारकांनी याबाबत सतत बोटे मोडली. मात्र, त्या दर्जाच्या सुविधांबाबत इतकी डोळेझाक का होते, याचे उत्तर अद्यापपर्यंत कुणाला मिळालेले नाही.
यापूर्वीही अनेकवेळा सर्व्हिस रोडवरील पथदीप आणि जंक्शनवरचे हायमास्ट सतत बंद असतात, याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समोर आले. टोल वसुलीतून प्राधिकरण सक्षम असताना, तेथील अधिकारी मात्र ‘दिवस काढा, वाहने वेगात राहतील अन् समस्या सुरूच राहतील’, या मानसिकतेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.