Nashik Load Shedding : शहरात विजेचा लपंडाव सुरूच! महावितरणने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा

Latest Power Cut News : महावितरण नाशिककरांचा चांगलाच घाम काढत आहे. नाशिकमध्ये यापूर्वी इतक्यावेळा वीज पुरवठा खंडित झालेला नव्हता जो गेल्या चार महिन्यांत झाला आहे.
Load Shedding
Load Sheddingesakal
Updated on

Nashik Load Shedding : पाऊस सुरू झाला का वीज गायब हे एक समीकरणच झाले आहे. ऑक्टोबर महिन्याअगोदरच नाशिक शहरात उष्णता वाढण्यास सुरवात झाली आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा महावितरणचे वीज नियोजन ढासळलेले दिसत आहे. त्यामुळे महावितरण नाशिककरांचा चांगलाच घाम काढत आहे. नाशिकमध्ये यापूर्वी इतक्यावेळा वीज पुरवठा खंडित झालेला नव्हता जो गेल्या चार महिन्यांत झाला आहे. (Electricity continues to shed in city)

पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा, खासगी व व्यावसायिक वीज ग्राहकांना योग्यरीत्या सेवा मिळावी, यासाठी महावितरण वर्षभर देखभाल दुरुस्तीची कामे करते. पावसाळा सुरू होण्याअगोदर मोठ्या प्रमाणात मेंटेनन्सची कामे केली जातात. यामुळे मुसळधार पावसामध्ये वीजपुरवठा खंडित होणार नाही.

यंदा सर्वाधिक वेळा वीज खंडित झालेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरच वीजसुद्धा सध्याच्या युगामध्ये एक अत्यावश्यक व प्राथमिक गरज म्हणून आवश्यक आहे. पूर्वी वीजेचा उपयोग हा फक्त घरातील अंधार दूर करण्यासाठी होत असे. मात्र आता शेकडो अशी उपकरणे आहेत की ज्यासाठी विजेची गरज असते.

घरगुती आणि व्यावसायिक या दोन्हीही ग्राहकांना विजेशिवाय पर्याय नाही. नाशिक शहर वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे येथील विजेची गरजही दिवसेंदिवस वाढत आहे. महावितरणकडून वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्याची कमतरता नाही, असे कायम सांगितले जाते. मात्र शहरात थोडा जरी पाऊस सुरू झाला तरी वीजपुरवठा खंडित होतो. (latest marathi news)

Load Shedding
राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार; आयुर्मान असणार 100 वर्षे

महावितरणची ग्राहकांना मिळणारी उत्तरे

-आमच्या एरियात येत नाही

-रस्त्याची ही बाजू की ती बाजू सांगा

-माझी बदली झालेली आहे

-तुम्ही त्यांना फोन करा पण माझे नाव सांगू नका

-वायर पंचर झाली आहे

"अचानकपणे वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आर्थिक नुकसानही होते. महावितरणने कायमस्वरूपी अशी व्यवस्था निर्माण करावी की वीजपुरवठा खंडित होणार नाही."- अनिल जोंधळे, वीज ग्राहक

Load Shedding
OBC reservation : अठरापगड जातींची मोट बांधावी : प्रा. लक्ष्मण हाके यांचे ओबीसी नेत्यांना आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.