Nashik News : जिल्हा रुग्णालयाचा आप्तकालीन कक्ष पाठीमागे! रुग्णांची गैरसोय; रात्री-बेरात्री रुग्णांच्या नातलगांचे हेलपाटे

Nashik News : बहुतांश रुग्णांना तर शोधत-शोधत जावे लागते. सदरची गैरसोय टाळण्यासाठी सदरचा कक्ष रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच असावा, अशी रुग्ण व नातलगांची मागणी आहे.
Inconvenience in front of the window created for citizens in District Government Hospital.
Inconvenience in front of the window created for citizens in District Government Hospital.esakal
Updated on

नाशिक : सरकारी असो वा खासगी रुग्णालय... या रुग्णालयांचे आपत्कालीन कक्ष (कॅज्युलिटी) हा प्रथम दर्शनीस असतो. जेणेकरून रुग्णास तत्काळ प्राथमिक उपचार मिळावा, हाच त्या मागील हेतू असतो; परंतु नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचा आपत्कालीन कक्ष रुग्णालयाच्या मागे असलेल्या सिंहस्थ इमारतीत हलविण्यात आल्याने रुग्णांचे हेलपाटे मात्र वाढले आहेत.

बहुतांश रुग्णांना तर शोधत-शोधत जावे लागते. सदरची गैरसोय टाळण्यासाठी सदरचा कक्ष रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच असावा, अशी रुग्ण व नातलगांची मागणी आहे. (Emergency room of district hospital behind inconvenience to patients)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.