Nashik News : श्रावण महिना सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते. पावसानेही ठिकठिकाणी कमी-अधिक प्रमाणात हजेली लावली. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. १९ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने आतापासूनच विविध प्रकारच्या राख्यांनी स्टॉल सजले आहेत. कसमादे पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाला. जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत धरणात साठा आहे. आता पाऊस कमी होताच व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांनी रक्षाबंधनासाठी कसमादे पट्ट्यात दुकान थाटलेली आहेत. ( purchase of rakhi in market due raksha bandhan )