जुने नाशिक : सण, उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील पारंपारिक मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी (ता.१२) काढण्यात आले. सारडा सर्कल येथून अतिक्रमण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. (Encroachment on ganeshotsav procession route removed)