Nashik News : सटाणा शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गावरील अतिक्रमण आता निघणार; कार्यकर्ते-अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत

Nashik : पुष्पांजली चित्रपटगृह ते जिजामाता उद्यानापर्यंत थेट २४ मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता करण्यावर सोमवारी (ता. २२) सर्वपक्षीय कार्यकर्ते व अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले.
Tehsildar Deepak Chawde during the meeting organized to remove encroachment on Sakri-Shirdi road. Former MLA Sanjay Chavan, Manoj Sonwane etc.
Tehsildar Deepak Chawde during the meeting organized to remove encroachment on Sakri-Shirdi road. Former MLA Sanjay Chavan, Manoj Sonwane etc.esakal
Updated on

Nashik News : शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील पुष्पांजली चित्रपटगृह ते जिजामाता उद्यानापर्यंत थेट २४ मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता करण्यावर सोमवारी (ता. २२) सर्वपक्षीय कार्यकर्ते व अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले. गेल्या महिनाभरापासून थेट समान न्याय तत्त्वाने अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी बंद पडलेले काँक्रिटीकरणाचे काम आता पुन्हा सुरू होणार असून, अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून मृत्यूचा सापळा बनलेला राज्य महामार्ग मोकळा श्‍वास घेणार आहे. (encroachment on state road passing through Satana city will be removed now )

सोमवारी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर परिषद अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे अधिकारी, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित काँक्रिटीकरणाबाबत चर्चा सुरू झाली. साक्री-शिर्डी राज्य महामार्गाचे काम पुष्पांजली चित्रपटगृहाजवळ येऊन थांबले आहे; तर सम्राट बिअर बारपासून रस्ता दुभाजकाच्या डाव्या बाजूने निम्मा रस्ता काँक्रिटीकरण झाला आहे.

या वादातील रस्त्यावरील अतिक्रमण काढताना काही ठिकाणी ११/१२ किंवा १४ मीटर रुंदीप्रमाणे काढले जात असल्याचा आरोप होता. त्यावर वाद निर्माण झाल्याने काम थांबले होते. आजच्या बैठकीत रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हे मध्यातून दोन्ही बाजूंनी १२ मीटर काढण्यावर एकमत झाले. सध्या सम्राट बिअर बारपासून बसस्थानकापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. त्याच्या पश्‍चिमेकडील विरुद्ध बाजूने थेट बसस्थानकापर्यंत समान काँक्रिटीकरण करावे व पुढील जिजामाता उद्यानापर्यंतचा रस्ता हा अतिक्रमण काढल्यावर पूर्ण करावा, असा ठोस निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. (latest marathi news)

Tehsildar Deepak Chawde during the meeting organized to remove encroachment on Sakri-Shirdi road. Former MLA Sanjay Chavan, Manoj Sonwane etc.
Nashik News : अंदाजपत्रकात तरतूद रक्कम खर्च करण्याकडे कल; जलकुंभ दुरुस्तीसाठी निधी

या वेळी झालेल्या चर्चेत माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, माजी नगरसेवक मनोज सोनवणे, साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनवणे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मंगेश खैरनार, भारत खैरनार, अनिल पाकळे, केशव मांडवडे, साहेबराव सोनवणे, विजयराज वाघ, ज. ल. पाटील, संदीप खैरनार, भूषण निकम, पंकज सोनवणे, नीलेश कांकरिया, मिलिंद चित्ते, गजानन साळवे, प्रफुल्ल कुवर, चेतन सूर्यवंशी, योगेश सोनवणे, रोहित येवला, समाधान पवार, विजय सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता सतीश आहेर, सहाय्यक अभियंता अनिल पाटील, नितीन वार्डेकर, प्रकाश हिंगोले, रवीकुमार सिंग आदींसह नागरिक उपस्थित होते.

''साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग हा पूर्वी राज्य महामार्ग होता. २०१७ मध्ये केंद्र सरकारने याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला. गुजरातला जोडणारा सर्वांत जवळचा महामार्ग असल्याने या महामार्गावर ताहाराबाद ते सटाणा व पुढे देवळ्यापर्यंत दररोज मोठी अवजड वाहतूक चालते. महामार्गाच्या प्रलंबित कामामुळे अनेक निष्पाप नागरिक व विद्यार्थ्यांचे बळी गेले आहेत. येत्या १४ ऑगस्टपर्यंत ताहाराबाद पूल रहदारीस खुला न झाल्यास १५ ऑगस्टला आंदोलन छेडू.''- दीपिका चव्हाण, माजी आमदार, बागलाण

Tehsildar Deepak Chawde during the meeting organized to remove encroachment on Sakri-Shirdi road. Former MLA Sanjay Chavan, Manoj Sonwane etc.
Nashik News : नद्यांवरील पूररेषेची फेरआखणी होणार; जलसंपदा विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()