Nashik News : कमानी, वाहतूक बेटांनी घेतला मोकळा श्वास

Nashik : महापालिकेच्या दिशादर्शक कमानी, दुभाजक आणि वाहतूक बेटांना राजकीय फलक, झेंडे यांचा विळखा पडला होता.
Western Division Anti-encroachment Team removing banners on the directional arches.
Western Division Anti-encroachment Team removing banners on the directional arches.esakal
Updated on

Nashik News : महापालिकेच्या दिशादर्शक कमानी, दुभाजक आणि वाहतूक बेटांना राजकीय फलक, झेंडे यांचा विळखा पडला होता. पश्चिम विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून शनिवारी (ता.१६) कारवाई करत हे फलक, झेंडे हटविण्यात आले. यामुळे वाहतूक बेट आणि कमानींनी मोकळा श्वास घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांना वेग आला होता. (nashik encroachment removal team took action and removed these boards and flags marathi news)

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे शहरात दौरे झाले. रोड शो, सभा झाल्या. यानिमित्ताने सर्वच पक्षांनी शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केला. शहरातील वाहतूक बेट, दिशादर्शक कमानी, दुभाजक यांचा वापर करण्यात आला. मोठ-मोठे होर्डिंग, फलक, झेंडे यावर लावले. त्यामुळे कमानी, बेटांसह शहरास बकाल स्वरूप आले होते.

पश्चिम विभागाकडून शनिवारी (ता.१६) याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पश्चिम विभागात येणाऱ्या कमानी बेटांसह रस्त्यावरील अशा प्रकारचे अतिक्रमण हटविले. महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांच्या आदेशाने विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात त्र्यंबक नाका सिग्नल.(latest marathi news)

Western Division Anti-encroachment Team removing banners on the directional arches.
Nashik News : नाईन पर्ल्स हॉस्‍पिटलमध्ये आयव्‍हीयुएस, एफएफआर तंत्रज्ञान

गडकरी चौक ते गंजमाळ सिग्नल, शालिमार, सरकारवाडा पोलिस स्टेशन ते सीबीएस, गंगापूर रोड डोंगरे वस्तीगृह मैदान परिसर, एबीबी सर्कल, मायको सर्कलपर्यंत होर्डिंग, झेंडे, फलक काढले. त्यामुळे कमानी, बेट आणि रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

अशी झाली कारवाई

कमानीवरील फलक २२

झेंडे ११८

होल्डिंग बॅनर १२

स्टॅन्ड बोर्ड ३

पोल बॅनर १८

Western Division Anti-encroachment Team removing banners on the directional arches.
Nashik News : बॅंकांना कर अडचणीबाबत आयकर विभाग मदत करणार : हर्षद आराधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.