कळवण : संपूर्ण राज्यात आरटीई प्रवेशप्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने प्रवेशाबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेशाची यादी जून महिना संपून देखील आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. यामुळे संपूर्ण राज्यात नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (end of June RTE admission process has not started)
शाळा सुरू होऊन १५ दिवस झाले आहेत, अद्याप पाल्याचा प्रवेश नसल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांना वाटत आहे. आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशांतर्गत नोंदणी केलेल्या शाळांमध्ये २५ टक्के कोटा राखीव ठेवण्यात येतो. त्यामुळे पालक आरटीईतून पाल्याचा प्रवेश व्हावा या प्रतीक्षेमध्ये असतात. दरवर्षी आरटीईची प्रवेशप्रक्रिया आतापर्यंत अर्धी झालेली असते.
मात्र, यंदा जून संपून जुलै लागला तरी पालकांना कोणतीही सूचना किंवा माहिती मिळत नाही. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रवेश नाकारणे तर, कधी शासनाकडून प्रवेशप्रक्रियेत बदल होणे आणि शाळा सुरू झाली तरी प्रवेशाला अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशाची अडथळ्यांचा टप्पा काही संपत नाही. आरटीई प्रवेशाबाबत होणाऱ्या दिरंगाईमुळे पालक हैराण झाले आहेत. याबाबतचा निर्णय लवकर व्हावा, ही अपेक्षा आहे. (latest marathi news)
"शैक्षणिक सत्राला सुरवात होऊनही आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने प्रवेशाबाबत अनभिज्ञता आहे, यामुळे पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन वर्ष वाया जाण्याची भीती असल्याने शासनाने लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घ्यावा." - हेमंत आहेर, पालक, निवाणे
"आरटीई मार्फत प्रवेशाची अपेक्षा असल्याने त्यावर बरेचसे पालक अवलंबून असून दुसरीकडेही प्रवेश घेतलेला नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने यावर तातडीने तोडगा काढून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा द्यावा." - हेमंत देवरे, पालक, कळवण.
"कळवण तालुक्याला आरटीई योजनेमध्ये १०७ विद्यार्थी उद्दिष्ट देण्यात आले आहे. तालुक्यातील २७० ते ३०० विद्यार्थी पालकांनी अर्ज केले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने शासन निर्णय झाल्यावरच अंमलबजावणी करण्यात येईल." - हेमंत बच्छाव, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कळवण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.