Nashik News : कंपनीने पंजाब येथे पाठवल्याचे फोन वरून सांगत असलेला अभियंता मात्र गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता झाल्याची घटना सातपूरमध्ये समोर आली आहे. अशिक्षित आई-वडील गेल्या पंधरा दिवसांपासून पोलिस ठाण्यात खेट्या मारत असून निवडणुकीच्या धामधुमीत मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नसल्याचा आरोप या हताश पालकांनी केला आहे. (engineer missing for 4 months)
जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील जानवे गावातील भिकन पाटील या अशिक्षित शेतकऱ्याने त्यांचा एकुलता एक मुलगा कैलास यास अभियंता बनवले. कैलासने मेहनत घेऊन नोकरीसाठी सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत ट्रेनी म्हणून कामही केले. त्याची हुशारी पाहून कंपनीने त्याला गोवा प्लॅन्टमध्ये पाठवले.
एक-दोन वर्षांनंतर मात्र कैलासने गोव्याची नोकरी सोडून तो पुन्हा नाशिकला आला. यानंतर तो अंबड औद्योगिक वसाहतीत कामाला लागला. त्याचवेळी घरच्यांनी त्याच लग्न ठरवले. पुढे एक वर्षांनंतर मात्र त्याने अंबडमधील कंपनीही बदलली, असे तो घरच्यांना सांगत होता. घरच्यांनी कंपनीचे नाव विचारले तर मात्र तो काहीही बोलत नव्हता. (latest marathi news)
त्याच काळात त्याने श्रमिकनगरमध्ये भाड्याने खोली घेत आई-वडील व पत्नीसह कुटुंब नाशिकमध्ये आणले. घरखर्च वाढल्यामुळे तो सकाळी घरातून कामाला निघाला की रात्रीच घरी येत असे. या दरम्यान आई-वडील व पत्नीनेही अनेकवेळा कोणत्या कंपनीत कामाला आहे, अशी विचारणा केली पण तो त्याबाबत काहीच सांगत नव्हता.
अशातच चार महिन्यांपूर्वी कंपनीने पंजाबला पाठवले आहे, असे सांगून घरातून गेला त्यानंतर फोन वरून दिवसा आड कुटुंबाशी बोलणं होत असे. पण घरी येण्याबाबत विचारले तर काहीच सांगत नव्हता, असे कैलासचे आई-वडील सांगतात. गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून कैलासशी संपर्क होत नाही.
त्यामुळे हताश झालेले आई-वडील, पत्नी आणि इतर नातेवाईक गेल्या पंधरा दिवसांपासून सातपूर पोलिस ठाण्यात चकरा मारत आहेत. कैलास अचानक बेपत्ता होण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.