Nashik News : इंजिनिअर युवकाचा दुग्ध प्रकिया प्रकल्प लोकप्रिय! कृषि विभागाचे मार्गदर्शन

Nashik News : नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचाही व्यवसाय असावा अन् आपणही नोकरी देणारे बनावे या हेतूने ऋषिकेश जाधव या इंजिनिअर युवकाने स्वतःचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे.
Board Agriculture Officers Hitendra Pagar, Santosh Gosavi, Vitthal Sonwane etc. while inspecting the milk processing industry started by Rishikesh Jadhav.
Board Agriculture Officers Hitendra Pagar, Santosh Gosavi, Vitthal Sonwane etc. while inspecting the milk processing industry started by Rishikesh Jadhav.esakal
Updated on

येवला : ‘केल्याने होत आहे रे आणि केलेची पाहिजे...’ ही उक्ती सार्थ ठरवत इंजिनिअरिंग (बीई) शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचाही व्यवसाय असावा अन् आपणही नोकरी देणारे बनावे या हेतूने ऋषिकेश जाधव या इंजिनिअर युवकाने स्वतःचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. (Engineer youth milk process project is popular)

या ठिकाणी खवा, पनीर, लस्सी, आईस्क्रीमचे उत्पादन करून महिन्याला ५० हजाराची कमाई हा युवक करीत आहे. दुष्काळ येवल्याच्या पाचविला पुजलेला... त्यात ३ एकर कोरड‌वाहु जमिन असलेल्या राजेंद्र जाधव या शेतकऱ्याच्या मुलाने बीई (मेकॅनीक) पदवी कष्टाने मिळवली. पदवी मिळवल्यावर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली.

मात्र, कुटुंबापासून लांब, तुटपुंजा पगार व काहीतरी करून दाखवण्याची मनात असलेली उर्मी. यामुळे नोकरीला रामराम ठोकून ऋषिकेश भापल्या गावी अंदरसूलला परतला व शेती करू लागला. बेभरवशाच्या शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतीला जोडून काहीतरी व्यवसाय करावा हा विचार मनात आला. यातूनच दुग्ध व्यवसायाचा पर्याय पुढे आला. परिसरातील शेतकऱ्यांकडून

दुध संकलन करुन कुटुंबाला हातभार लावू लागला.

त्याची धडपड व उमेद पाहुन कृषी सहाय्यक संतोष गोसावी व कृषी पर्यवेक्षक विठ्ठल सोनवणे यांनी पंतप्रधान सुष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी कृषी विभागाच्या योजनेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यातूनच ऋषिकेशचा उभा राहिला, तो शेतकरी दुग्ध प्रक्रिया उद्योग! (latest marathi news)

Board Agriculture Officers Hitendra Pagar, Santosh Gosavi, Vitthal Sonwane etc. while inspecting the milk processing industry started by Rishikesh Jadhav.
Nashik ZP News : जिल्हा परिषदेचा 46 टक्के निधी खर्च! निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

ऋषिकेशने या व्यवसायात अभ्यासपूर्ण प्रवेश केला आणि स्टीम बॉयलर पद्धतीचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प उभारून नाविन्याची कास धरली. यातच त्याने खवा, पनीर, लस्सी, पेढा, श्रीखंड, आम्रखंड अशा दुग्धजन्य खाद्यपदार्थाची निर्मिती सुरू केली आहे.

विशेष म्हणजे अल्पावधीत हा त्याचा व्यवसाय लोकप्रिय झाला असून लग्नसराईत परिसरातून चांगली मागणी या पदार्थांना होऊ लागली. त्यासोबतच अंदरसूल येथे नाशिक- औरंगाबाद महामार्गावर विक्री केंद्र देखील सुरू केले असून ग्राहकांची पसंती मिळत आहे.

ब्रॅडींग करण्याचा मानस

उद्योग उभारणीसाठी एचडीएफसी बँकेने १३ लाख रुपये कर्ज दिले असून, कृषी विभागाच्या पाच लाख ८६ हजारांच्या अनुदानास हे कर्ज पात्र ठरले आहे. शेतीचा मुख्य व्यवसाय असल्याने दुय्यम व्यवसाय म्हणून दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू केला. मात्र, तोच मुख्य व्यवसाय झाला असल्याचे ऋषिकेश सांगतो.

Board Agriculture Officers Hitendra Pagar, Santosh Gosavi, Vitthal Sonwane etc. while inspecting the milk processing industry started by Rishikesh Jadhav.
Nashik Agriculture News : क्रॉपकव्हरद्वारे वाढलेल्या रेडग्लोब द्राक्षबागेला प्रधान सचिवांनी भेट

महिन्यासाठी मजुरांची मजुरी व इतर खर्च वजा जाता आता सरासरी ५० हजार रुपयापर्यंत त्याला उत्पन्न मिळत आहे. यापुढील काळात पॅकेजिंग व ब्रॅडिंग करण्याचा त्याचा मानस असून, अल्पावधीत त्याने घेतलेली गरुडझेप इतर तरुणांपुढे आदर्शवत आहे.

"सुशिक्षित व उद्योग उभारू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी पंतप्रधान सुष्म प्रक्रिया योजना वरदान ठरत आहे. ऋषिकेशने या माध्यमातूनच साधलेली प्रगती कौतुकास्पद आहे. इतर शेतकरी बांधवांनी देखील रोजगार निर्मितीसह विकास साधण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा." - हितेंद्र पगार, मंडळ कृषी अधिकारी

Board Agriculture Officers Hitendra Pagar, Santosh Gosavi, Vitthal Sonwane etc. while inspecting the milk processing industry started by Rishikesh Jadhav.
Nashik News : जिर्णोद्धार केलेल्या पुरातन घाटांची मोडतोड नको! विविध पक्ष, संघटनांचे गोदाघाटावर ठिय्या आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.