पंचवटी : इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) उघडकीस आली. पालकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने के. के. वाघ महाविद्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. अस्मिता संदीप रौंदळ-पाटील (वय १८, रा. सटाणा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. (student extreme step in hostel in Panchvati)
अस्मिता दोन दिवसांपूर्वी तिच्या घरी आई-वडिलांना भेटून महाविद्यालयात दाखल झाली होती. अत्यंत शांत व सोज्वळ स्वभावाची अस्मिता एकाएकी असे टोकाचे पाऊल उचलू शकत नाही. यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचा आरोप नातेवाइकांनी करीत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली.
वसतिगृह महिला व्यवस्थापक याबाबत काहीतरी माहिती लपवत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाने घटनेची माहिती अस्मिताच्या आई-वडिलांना न देता नातेवाइकांना का दिली? पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊ न देता मृतदेह परस्पर जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी का पाठविला, असे प्रश्न विचारल्यावर महाविद्यालय प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप पालकांनी केला. (latest marathi news)
वसतिगृह महिला व्यवस्थापकास अटक होईपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी उशिरापर्यंत महाविद्यालयाच्या वसतिगृहाबाहेर पालक व नातेवाइकांनी ठिय्या दिला. यामुळे आडगाव पोलिसांनी महाविद्यालयात बंदोबस्त वाढविला.
"वसतिगृह रेक्टर नेहमीप्रमाणे सकाळी अस्मिताला उठविण्यासाठी गेले असता, आतून प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा शेजारील रूममधील विद्यार्थिनींना सोबत घेऊन रूमचा दरवाजा तोडल्यावर ही घटना उघडकीस आली. या वेळी अस्मिता रूममध्ये एकटीच होती. यानंतर आडगाव पोलिसांसह अस्मिताचे नाशिकमधील नातेवाईक व भाऊ यांना कळविले."
- अजिंक्य वाघ, विश्वस्त, के. के. वाघ शिक्षण संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.