Mumbai Nashik Expressway : नाशिकला विमानतळ आहे, पण थेट मुंबई विमानसेवा नाही. रेल्वे आहे, परंतु त्या वेळेत धावतील याची शाश्वती नाही. अन् नाशिक- मुंबई महामार्ग खड्ड्यात, अशा तिहेरी अडचणीत नाशिकच्या विकासाला खीळ बसली आहे. सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून गाजावाजा झाला परंतु नवीन उद्योग शहराच्या ‘कनेक्टिव्हिटी’ अभावामुळे नाशिकला येण्यास धजत नाहीत. तर, जे उद्योग आहेत त्यांना महामार्गाच्या दुरवस्थेमुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहेत. (Entrepreneurs and businessmen presented government with guarantees but received fake of promises )