Nashik News : वजनमापे विभागाबाबत उद्योजक साशंक; वजनकाट्यांचे ऑडिट करण्याची मागणी

Nashik : स्क्रॅप मालाचे वजन करताना फेरफार करून उद्योजकांना लाखोंचा ‘चुना’ लावल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अंबड औद्योगिक वसाहतीतील वजनकाटे पुन्हा चर्चेत आले आहेत.
Maharashtra weighbridge sealed by police.
Maharashtra weighbridge sealed by police.esakal
Updated on

Nashik News : अंबड औद्योगिक वसाहतीत स्क्रॅप मालाचे वजन करताना फेरफार करून उद्योजकांना लाखोंचा ‘चुना’ लावल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अंबड औद्योगिक वसाहतीतील वजनकाटे पुन्हा चर्चेत आले आहेत. उद्योजकांनी या काट्यावरील फेरफारबद्दल वजनमापे विभागाबाबतच संशय व्यक्त केला असून, वजनकाट्यांचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अंबड पोलिसांनी अंबडमधील महाराष्ट्र वजनकाट्यासह तीन काटे सील केले. (Entrepreneurs suspicious of weighing department demand audit of scales )

स्क्रॅप मालाचे वजन करण्यात येणाऱ्या काट्यांवर फेरफार होत असल्याच्या प्रकारामुळे उद्योजकामध्ये संतापाची लाट उसळली असून, स्क्रॅपचे वजन कोणत्या वजनकाट्यावर करावे किंवा स्वतः कंपनीत वजनकाटे बसवावेत का, अशा विचारापर्यंत ते आले आहेत. वजनमापे विभागाने वजनकाट्यांची तपासणी करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये स्क्रॅप खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांनी वजनकाटे मालकांशी संगनमत करून कंपन्यांमधून भरणारे स्क्रॅप मटेरिअलचे वजन कमी दाखवून पावतीमध्ये फेरफार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणात अंबड ‘एमआयडीसी’ पोलिसांनी अंबडमधील तीन वजनकाटे सील करून यातील डाटा संकलित केला आहे. (latest marathi news)

Maharashtra weighbridge sealed by police.
Nashik News : भातशेती रुतली मजुरीच्या चिखलात; स्थानिक मजूर उद्योग कारखान्यात कार्यरत

विशेष म्हणजे एका तक्रारदाराने ही तक्रार केल्यानंतर वजनकाट्यांमध्ये फेरफार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अजूनही वजनमापे विभागाकडून याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे दर महिन्याला या वजनकाट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम वजनकाटे विभागाचे आहे.

मात्र येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे फेरफार दिसत नाहीत का, की दुर्लक्ष करण्यात येते, असा आरोप काही उद्योजकांनी केला आहे. यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये स्क्रॅपचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वच वजनकाट्यांवरील मशिनचे दर महिन्याला ऑडिट करावे व फेरफार करणाऱ्या वजनकाट्यांची परवानगी कायमस्वरूपी रद्द करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

''अंबड औद्योगिक वसाहतीत काही वजनकाट्यांमध्ये मॅन्युअली व मशिनच्या सहायाने एकाच ट्रकच्या वजनाच्या दोन पावत्या काढल्या जातात, असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे उद्योजकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सोमवारी वजनमापे विभागाला उद्योजकांतर्फे निवेदन देण्यात येणार आहे.''- साहेबराव दातीर, उद्योजक

Maharashtra weighbridge sealed by police.
Nashik News : अतिरिक्त आयुक्तांच्या तपासणीत स्वच्छता कर्मचारी चक्क गैरहजर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.