नाशिक : अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर आता हिवाळ्याची चाहुल लागली आहे. दिवसा कडक उन पडत असले तरी, सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. गेल्या पाच दिवसांत पाऱ्यामध्ये पाच अंश सेल्सिअसची घसरण झालेली आहे. रविवारी (ता.२७) नाशिकचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर तितक्याच कडाक्याचा हिवाळा असेल, असा अंदाज वर्तविला जातो आहे. (estimated that this year after satisfactory rains there will be an equally severe winter )