Nashik News : 14 वर्षानंतरही नववसाहती वनवासात! मालेगाव महापालिकेत समावेश होउनही समस्या कायम

Latest Marathi News : गेल्या चौदा वर्षांनंतर मुलभूत सोयी सुविधांची वानवा आहे. वाढत्या वर्दळीचा परिसर नामपूर रोडवरील दूध डेअरीचा परिसर अंधकारमय आहे.
Malegaon municipal Corporation
Malegaon municipal Corporationesakal
Updated on

मालेगाव शहर : शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवनवीन वसाहती निर्माण झाल्या.शहरातील अनेक भाग हद्दवाढीनंतर महापालिकेत समाविष्ट झाला. तरीही गेल्या चौदा वर्षांनंतर मुलभूत सोयी सुविधांची वानवा आहे. वाढत्या वर्दळीचा परिसर नामपूर रोडवरील दूध डेअरीचा परिसर अंधकारमय आहे. (after 14 years Navvasahati in Problem Malegaon Municipal Corporation)

सध्या नामपूर रोडवर मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे, व्यावसायिक गाळे, वैद्यकीय सेवेसह पेट्रोल पंप व नागरी वसाहती वाढल्या आहेत.नामपूर रोडवरील या गजबजलेल्या भागात स्ट्रीट लाईटचा अभाव आहे. नामपूर रोडवर भोसले पंपापर्यंत जेमतेम पथदीप व्यवस्था आहे.

त्यातही एक खांबावर दिवा चालू तर पुढील दोन खांब बंद अशी अवस्था झाली आहे. काही खांबांवरील दिवे बंद अवस्थेत आहेत. काही सातत्याने लुकलुकतात, अनेक ठिकाणी अंधारातूनच लोकांना मार्गक्रमण करावे लागते.जुने पथदिवे बदलून त्या जागी एलईडी दिवे बसविण्याची आवश्यकता आहे.

परिसरातील अनेक चौकासह मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आढळतात तर काही ठिकाणी लुकलुकत असतात.याशिवाय शहरातील अनेक वॉर्डातही पथदिवे बंद आहेत. अंधारातच शहरातील लोकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे, छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहे. (latest marathi news)

Malegaon municipal Corporation
Nashik NMC: भूसंपादन विभागाची भूमिका वादाच्या भोवऱ्यात! धामणकर कॉर्नर येथे भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले मार्गदर्शन

सणासुदीत अंधार

सणासुदीचे दिवस असतानाच चोरांनी शहरातील कॉलनींकडे मोर्चा वळवला आहे. अशावेळी पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटनांना पायबंद घालणे शक्य नाही. गेल्या आठ दिवसांपासून चर्च परिसर, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसर, टीव्ही सेंटर, भगतसिंग नगर, प्रेरणा सोसायटी, राजमाता जिजाऊ नगर,शाकंभरी कॉलनी, आदर्श कॉलनी, नर्मदेश्वर मंदिर, ,शिक्षक कॉलनी या परिसरातील चोरांचा सुळसुळाट असल्याने भयभीत होऊन तरुण मंडळी जागरण करून खबरदारी घेत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेच्या विद्युत विभागाने पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करून नव्याने एलसीडी बसवावे अशी मागणी केली आहे.

"चर्चगेट ते नामपूर रोड परिसरात दोन्ही बाजूने लाईटची गरज आहे. दूध डेअरी भागापर्यंत रहिवाशांना रात्री अपरात्री जाताना अंधाराचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने एलईडी पथदीप कार्यान्वित करावेत."

- शीतल महेंद्र साळुंखे, नागरिक, नर्मदेश्वर मंदिर परिसर.

"सर्व नववसाहती भागात चोरांसह , मोबाईल स्नॅचिंगचे प्रकार सायंकाळनंतर खूप वाढले आहेत. जेष्ठ नागरिक व महिला यांना अंधाराचा फटका बसतो. शहराचा विस्तार पाहता सर्वत्र पथदिव्यांची आवश्यकता आहे."- पंकज वाघ, सामाजिक कार्यकर्ते,प्रेरणा कॉलनी.

Malegaon municipal Corporation
Nashik NMC News : खड्डे बुजविण्यासाठी 53.77 कोटीचा खर्च!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.