नाशिक : गेल्या आठवड्यामध्ये शहर वाहतूक शाखेने आयुक्तालय हद्दीमध्ये विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात धडक दंडात्मक मोहीम राबविली. त्यावेळी कारच्या काचांना काळ्या फिल्म असणार्यांवरही दंडात्मक कारवाई केली गेली. परंतु पोलिसांची मोहिम थंडावताच पुन्हा कारचालकांची मुजोरी वाढली असून, शहरभर बिनधास्तपणे काळ्या काचा असणार्या कार रस्त्यावर धावताना दिसत आहे. (nashik Even after action on drivers break traffic rules in city marathi news )
विशेषत: या कार शहरातील काही प्रतिष्ठीतांच्याही असल्याचे निदर्शनास आले आहे. शहर आयुक्तालय हद्दीत वाहतूक शाखेच्या चारही विभागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. चारचाकी वाहनांच्या काचा पारदर्शक असणे बंधनकारक आहे.
असे असले तरी काहीजण आपल्या कारच्या काचांना गडद काळ्या रंगाच्या फिल्म लावतात, जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे आहे.अशा वाहनांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार, या कारवाईमध्ये गडद काळ्या काचा लावून फिरणाऱ्या ६५ चारचाकी चालकांसह ९८ फॅन्सी नंबर प्लेट लावून मिरविणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
यात काळ्या काचाप्रकरणी ३५ हजार ५०० रुपये तर, फॅन्सी नंबरप्लेटप्रकररी ४९ हजार असा एकूण ८१ हजार ५०० रूपयांचा दंड ई-चलानद्वारे आकारण्यात आला होता. मात्र, वाहतूक शाखेची ही मोहीम थंडावताच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी पुन्हा वाढली आहे. (latest marathi news)
शहरातील मुख्य रस्त्यावरून काळ्या काचा लावून चारचाकी वाहने बिनधास्तपणे फिरताना दिसतात. अगदी आयुक्तालयाबाहेर असलेल्या रस्त्यालगत पार्क करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांमध्येही काही कारच्या काचांना काळ्या फिल्म लावण्यात आलेल्या असतात. तरीही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे.
यांच्यावरही व्हावी कारवाई
वाहतूक शाखेकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना सातत्याने लक्ष्य केले जाते. त्यामुळे सर्वसामान्य असणार्या दुचाकीस्वारांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. परंतु त्याचवेळी चारचाकी वाहनांच्या काचांना सर्रासपणे काळ्या फिल्म लावून त्या शहरभर फिरतात. त्या वाहनांविरोधात मात्र दंडात्मक कारवाई होत नाही. हा दुजाभाव का, असा रास्त प्रश्न सजग नागरिकांकडून उपस्थित केला जातो. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या अशा मुजोर कारचालकांवरही कारवाई व्हावी व अशा कारवाईत सातत्य असावे अशीही मागणी होते आहे.
प्रतिष्ठितांकडे दूर्लक्ष
सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. राजकीय नेत्यासह त्यांचे पदाधिकार्यांच्या गाड्यांचा ताफा सतत शहरात वावरतो आहे. यातील बहुतांशी पदाधिकार्यांच्या वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावण्यात आलेल्या आहे. या प्रतिष्ठितांच्याही वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्याकडे वाहतूक पोलिसांकडून सोयीस्कररित्या दूर्लक्ष केले जाते याचेही आश्चर्य व्यक्त होते आहे.
''चारचाकी वाहनांना काळ्या फिल्म लावणे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. अशा वाहनांविरोधात वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. बेशिस्त वाहनचालकांविरोधात पुन्हा मोहीम राबविली जाईल. त्यामुळे कोणीही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.''- चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.