Nashik News : प्रत्‍येक चौथ्या व्‍यक्‍तीला पक्षाघाताचा धोका; इंडियन स्‍ट्रोक असोसिएशनतर्फे ‘मिशन ब्रेन अटॅक’

Nashik : वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढ होत असून, पक्षाघाताचे वाढते प्रमाण धोकादायक ठरत आहे. प्रत्येक चारपैकी एका व्‍यक्‍तीला पक्षाघात होण्याची शक्यता असते.
At the launch of 'Mission Brain Attack' organized by Indian Stroke Association, from left Dr. Shripal Shah, Dr. Arvind Sharma, Dr. Nirmal Surya, Minister Chhagan Bhujbal, Dr. Manoj Gunhane, Dr. P. Vijaya.
At the launch of 'Mission Brain Attack' organized by Indian Stroke Association, from left Dr. Shripal Shah, Dr. Arvind Sharma, Dr. Nirmal Surya, Minister Chhagan Bhujbal, Dr. Manoj Gunhane, Dr. P. Vijaya.esakal
Updated on

Nashik News : वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढ होत असून, पक्षाघाताचे वाढते प्रमाण धोकादायक ठरत आहे. प्रत्येक चारपैकी एका व्‍यक्‍तीला पक्षाघात होण्याची शक्यता असते. प्रत्‍येक मिनिटाला सरासरी तीन व्यक्तींना अर्धांगवायूचा (पक्षाघात) झटका येतो, अशी माहिती इंडियन स्‍ट्रोक असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या यांनी रविवारी (ता. ११) दिली. इंडियन स्ट्रोक असोसिएशन (आयएसए) यांच्‍यातर्फे पक्षाघाताबाबत जनजागृती करताना ‘मिशन ब्रेन अटॅक’ अभियान नाशिकला राबविले जाते आहे. (fourth person is at risk of stroke Mission Brain Attack by Indian Stroke Association )

यानिमित्त त्‍यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत माहिती दिली. याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉ. अरविंद शर्मा, डॉ. पी. विजया, डॉ. मनोज दुसाने, डॉ. समीर पेखळे, डॉ. श्रीपाल शहा आदी उपस्थित होते. डॉ. सूर्या म्‍हणाले, की वाराणसीतून मिशन ब्रेन अटॅक अभियानाला सुरवात केली असून, देशभरातील छोट्या व मध्यम स्वरूपाच्या शहरांमध्ये अभियान राबविले जाणार आहे. महाराष्ट्रात औरंगाबादनंतर नाशिकमध्ये अभियान राबविले.

लोकसंख्येच्या तुलनेत देशात मेंदू विकार तज्ज्ञांची संख्या अत्‍यल्‍प आहे. फिजिशियन्सद्वारे रुग्णांवर प्राथमिक उपचार होण्यासाठी व पक्षाघाताची जोखीम कमी करणे हा अभियानाचा उद्देश आहे. डॉ. सूर्या म्हणाले, रक्तदाब, शर्करा व कोलेस्टेरॉल ही पक्षाघाताची प्रमुख कारणे आहेत. पक्षाघाताचा त्रास झालेला असल्‍यास अशा व्‍यक्‍तीच्‍या कुटुंबातील सदस्‍यांनीही रक्तदाब, मधुमेह व कोलेस्टेरॉलशी संबंधित तपासणी करावी. लक्षणे आढळल्‍यास वयाच्या पस्तीशीनंतर नियमित आरोग्य तपासणी गरजेची ठरते. (latest marathi news)

At the launch of 'Mission Brain Attack' organized by Indian Stroke Association, from left Dr. Shripal Shah, Dr. Arvind Sharma, Dr. Nirmal Surya, Minister Chhagan Bhujbal, Dr. Manoj Gunhane, Dr. P. Vijaya.
Nashik News : अमली पदार्थविरोधात आता ‘टास्क फोर्स’; नियंत्रणासाठी राज्यभर नोडल अधिकाऱ्यांची टीम करणार काम

पक्षाघाताचा प्रतिबंध, जागरूकता, व्यवस्थापन, काळजी आणि पुनर्वसन अभियानातून केले जात असल्‍याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली. साडेचार तासांच्या सुवर्ण वेळेत थ्रॉम्बोलायसीस आणि मेकॅनिकल थोम्बेक्टॉमीसह जलदगतीने उपचार होणे आवश्‍यक असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले. यावेळी आयोजित कार्यशाळेत दोनशे डॉक्टरांनी सहभाग घेतला. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही उपक्रमाला शुभेच्‍छा दिल्या.

यामुळे पक्षाघाताचा धोका

संतुलन ढासळणे, दृष्टी अधू होणे, चेहऱ्यातील विचलन, हात आणि पाय कमजोर होणे, बोलण्यात अडथळा आदी लक्षणे आढळल्‍यास सावध झाले पाहिजे. अशा वेळी तातडीने नजीकच्‍या मेंदूविकार तज्‍ज्ञांचा सल्‍ला घ्यावा.

At the launch of 'Mission Brain Attack' organized by Indian Stroke Association, from left Dr. Shripal Shah, Dr. Arvind Sharma, Dr. Nirmal Surya, Minister Chhagan Bhujbal, Dr. Manoj Gunhane, Dr. P. Vijaya.
Nashik News : ‘जय जवान- जय किसान’ नावालाच : कैलास भोसले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.