Fraud Crime : बनावट पावतीपुस्तक छापून नाशिक बाजार समितीची फसवणूक करून शुल्क वसुलीच्या नव्वद लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणी बडतर्फ केलेल्या बाजार समिती कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात तत्कालीन सचिव अरुण काळे यांनी योग्य सहकार्य न करणे, न्यायालयात हजर न राहणे, आवश्यक कागदपत्र सादर न केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. (Secretary Arun Kale also arrested for embezzlement of 90 lakhs)
संशयित सुनील जाधव नावाची व्यक्ती बाजार समितीत लिपिक (प्रतवारी कर) या पदावर कार्यरत होती. १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ पर्यंत संशयित सुनील जाधवची जकात नाका मार्केट शुल्क वसुलीसाठी नेमणूक होती. यादरम्यान बाजार शुल्क वसुलीच्या काही रकमेचा भरणा त्यांनी बाजार समितीत केला होता. बनावट पावतीपुस्तक बनवून बाजार शुल्क वसूल केले आणि बाजार समितीने दिलेले पावतीपुस्तक कार्यालयात जमा करीत पावत्याच फाडल्या नाहीत, असे सांगितले.
पावती पुस्तक क्रमांक ३०९ सुनील विश्वनाथ जाधव यांना दिले नसताना त्या माध्यमातून बाजार शुल्काची वसुली मात्र झाल्याचे समोर आले आहे. बाजार समितीच्या एकूण १२ पावतीपुस्तकांचा गैरवापर करून पावती पुस्तकांमध्ये खाडाखोड करून कृषी बाजार समितीच्या दप्तरात फेरफार करून एकूण ८९ लाख ७७ हजार दोनशे रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी समितीचे सचिव प्रकाश घोलप यांनी सुनील जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
संशयित सुनील जाधव यांनी प्रथम नाशिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रक्रियेत उच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदविले. यात दोन वर्षांनी गुन्हा का नोंदविण्यात आला, विभागीय कारवाईत सेवासमाप्ती करण्यात आली. विलंबाचे कारण हे प्रशासक असल्यामुळे झाल्याचे नमूद केले गेले.
या गुन्ह्यात तत्कालीन सचिव संशयित अरुण काळे यांनी पोलिसांना तपास कामात सहकार्य केले नाही. न्यायालयात तारखेस वेळीच हजर न राहणे, न्यायालयात मागितलेले कागदपत्र सादर न करणे. वेळोवेळी आदेश देऊनही त्याचे पालन न करणे या कारणाहून न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी तत्कालीन सचिव अरुण काळे यांना ताब्यात घेण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक पडोळकर तपास करीत आहेत.
गुन्हा दाखल करण्यात काळेंचे दुर्लक्ष
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास एक वर्ष प्रशासकीय अधिकारी कामकाज बघत होते. त्या वेळी प्रशासकीय अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कारभारही होता. प्रशासकानंतर मुख्य हे सचिव होते. याच काळात संशयित सुनील जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत ठरावही झाला होता.
मात्र याकडे बडतर्फ तत्कालीन सचिव अरुण काळे यांनी दुर्लक्ष केले. ही बाब काळे यांना त्रासदायक ठरली असल्याचे बोलले जात आहे. न्यायालयाने याबाबत निरीक्षणदेखील नोंदविले आहे. तपासात अजूनही काही बाजार समिती कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.