MPSC Exam : लागा तयारीला, विविध पद भरतीसाठी परीक्षेची घोषणा! एमपीएससीतर्फे सूचना जारी; अर्ज करण्यासाठी या तारखेपर्यंत मुदत

Latest MPSC Exam News : उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेगवेगळ्या चार जाहिराती नुकत्याच प्रसिद्ध केल्‍या आहेत.
MPSC
MPSCesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्रतेनुसार या पदांच्‍या भरती परीक्षेसाठी येत्‍या ४ नोव्‍हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून प्रविष्ठ होता येणार आहे. वेगवेगळ्या एकूण २०२१ पदांसाठी परीक्षा होणार आहे. (exam announcement for various posts Notice issued by MPSC)

२०२४ वर्ष संपत आले असतांना, अद्याप पूर्वनियोजित अनेक पदांच्‍या पूर्व परीक्षा झालेल्‍या नाहीत. विविध कारणांनी या परीक्षांच्‍या आयोजनात विलंब झाला आहे. दुसरीकडे हजारो विद्यार्थी झोकून देत अभ्यासिकांमध्ये स्‍पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. या उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेगवेगळ्या चार जाहिराती नुकत्याच प्रसिद्ध केल्‍या आहेत.

यापैकी महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२४ च्‍या माध्यमातून सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्‍य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक या पदांची भरती होणार आहे. गट-क सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२४ च्‍या माध्यमातून उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलिफ व लिपिक, नगरपाल (मुंबई कार्यालय), तसेच लिपिक टंकलेखक, अशा पाच पदांसाठी परीक्षेद्वारे निवड होणार आहे. सहायक नगर रचनाकार, श्रेणी एक, गट ब या परीक्षेतून सहायक नगररचना कार, तसेच नगर रचनाकार, गट अ या संवर्गातील परीक्षेतून नगर रचनाकार पदासाठी भरती होणार आहे. (latest marathi news)

MPSC
Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्समध्ये 260 अंकांची वाढ, कोणते शेअर्स चमकले?

अशी आहे पदसंख्या

गट क संवर्ग----------------------------१३३३

गट ब (अराजपत्रित)--------------------४८०

सहायक नगर रचनाकार, गट ब-------१४८

नगर रचनाकार, गट अ ----------------६०

महत्त्वाच्‍या तारखा अशा

अर्ज सादर करण्याचा कालावधी-१५ ऑक्‍टोबर ते ४ नोव्‍हेंबर

ऑनलाइन परीक्षा शुल्‍क भरण्याची मुदत-४ नोव्‍हेंबरपर्यंत

चलनाद्वारे शुल्‍क भरण्याची मुदत-७ नोव्‍हेंबर

अंतिम निवडीसाठी २०२५ उजाडणार

गट ब संवर्गातील पदांसाठी पूर्व परीक्षा ५ जानेवारी २०२५ ला, तर गट क संवर्गातील पदांसाठी पूर्व परीक्षा २ फेब्रुवारीला होणार आहे. या पूर्व परीक्षांच्‍या माध्यमातून पात्रताधारक उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. नंतर काही पदांसाठी मैदानी चाचणी, तर काहींबाबत मुलाखत व इतर चाचण्या होतील. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी २०२५ चे निम्‍मे वर्ष जाणार असल्‍याने अंतिम निवडीसाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

MPSC
CM Eknath Shinde : महाराष्ट्राचा विकास हाच युतीचा धर्म : शिंदे,पारशिवनीत दोन हजार कोटींच्या कामाचे उद्‍घाटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.