Nashik News : खोदकामामुळे मार्ग बनला खडतर; पेठ फाटा- मोती सुपर मार्केट भागात वाहनचालकांची कसरत

Nashik : पेठ रोड काँक्रिटीकरण कामासाठी पेठ फाटा ते मोती सुपर मार्केट या भागातील मार्ग खोदला आहे.
Excavated road from Peth Phata to Moti Super Market area.
Excavated road from Peth Phata to Moti Super Market area.esakal
Updated on

Nashik News : पेठ रोड काँक्रिटीकरण कामासाठी पेठ फाटा ते मोती सुपर मार्केट या भागातील मार्ग खोदला आहे. या मार्गाच्या दुभाजकाच्या दोन्ही बाजूला खोदकाम केले असून, उर्वरित भाग वाहनांसाठी जाण्यासाठी सोडला आहे. मात्र, हा रस्ता अत्यंत अरुंद असून, त्यात खड्डे पडलेले असल्याने वाहनचालकांना येथून वाहने चालविणे मुश्कील होत आहे. अरुंद रस्ता आणि खड्ड्यांतून वाहने चालविण्याची मोठी कसरत त्यांना करावी लागत आहे. (Excavation road rough patch challenge for motorists in Moti Super Market area )

पेठ रोडचा डांबरी रस्ता खोदून तेथे काँक्रिटीकरण करण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. कालव्यापासून पुढे पेठ फाट्याकडे या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. सुरवातीला या कामासाठी एका बाजूचा रस्ता खोदून ते काम पूर्ण होईपर्यंत वाहनांना ये-जा करण्यासाठी दुसरा मार्ग वापरता येत होता. मात्र, आता पेठ फाटा ते मोती सुपर मार्केटपर्यंत भागात काम करताना दुभाजकाजवळ दोन्ही बाजूला डांबरी रस्ता खोदण्यात आला आहे.

Excavated road from Peth Phata to Moti Super Market area.
Nashik News : वीजपुरवठा बंद न करताच काम करताना दोघांचा मत्यू; विटावे येथील घटना

त्यात कैलास मठाच्या समोर रुंद जागा असल्याने त्या बाजूला वाहनांना फारशी अडचण होत नसली तरी दुभाजकाच्या पूर्वेला केलेल्या खोदकामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्या रस्त्यावरून जेमतेम दुचाकी जाऊ शकेल इतकीच जागा आहे. त्यामुळे रिक्षा, कार, ट्रॅक यासारखी वाहने चालविणे शक्य होत नाही. त्यात पावसामुळे चिखल झाला आहे. या मार्गावर खड्ड्यांचे प्रमाणही वाढले असल्याने अडचणीत आणखीच वाढ होत आहे. एक बाजूचे काम पूर्ण करून मगच दुसऱ्या बाजूचे खोदकाम केले असते, तर अशी अडचण निर्माण झाली नसती असे नागरिकांचे म्हणणे आहे.

काम कधी पूर्ण होणार?

अत्यंत रुंद मार्गावरून चारचाकी वाहने चालविणे शक्य होत नाही. दुचाकीस्वारांनाही वाहने घसरून पडण्याची भीती वाटत असल्याने अत्यंत सावधपणे वाहने चालविताना वाहनांची गती कमी होऊन येथे कोंडी निर्माण होत आहे. वाहनांची होणारी गर्दी, रस्त्यात पडलेले खड्डे आणि तयार झालेला चिखल यांच्यामुळे या मार्गावरून पायी ये-जा करणे अशक्यच झाले आहे. रस्ता तर खोदून ठेवला आहे. त्याचे काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नसल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पेठ रोडचा मार्ग अत्यंत खडतर राहणार असल्याचा सूर नागरिकांकडून निघत आहे.

Excavated road from Peth Phata to Moti Super Market area.
Nashik News : इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भरदिवसा खुन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.