Water Pollution : जलप्रदुषणामुळे ‘रामसर’चे अस्तित्व धोक्यात; वाढत्या जल प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

Nashik News : नाशिक शहर आणि औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी, पाणवेलींचा विळखा यामुळे गोदावरी प्रदुषणाची समस्या गंभीर बनली आहे.
A vessel occupied by Panvelis in Nandur Madhyameshwar Dam.
A vessel occupied by Panvelis in Nandur Madhyameshwar Dam.esakal
Updated on

Nashik News : गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहर आणि औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी, पाणवेलींचा विळखा यामुळे गोदावरी प्रदुषणाची समस्या गंभीर बनली आहे. जागतिक दर्जाचे रामसर क्षेत्र असलेल्या नांदुरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवासावर यामुळे परिणाम होणार असल्याने आता ‘रामसर’चे अस्तित्व धोक्यात आले आहे. (existence of Ramsar is in danger due to water pollution)

तसेच, नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील प्रमुख तालुक्यांना गोदावरीच्या जलप्रदुषणामुळे गंभीर परिणाम भोगावे लागत आहे. साहजिकच माणसांबरोबरच पशु-पक्ष्यांच्या अधिवासावरच परिणाम होऊ लागला आहे. स्थानिक मित्र मंडळ, स्वयंसेवी संस्था गोदावरी स्वच्छतेसाठी आग्रही असल्या तरी राजकीय अनास्थेमुळे गोदावरीच्या भाळी जलप्रदुषणाचा डंक कायम आहे.

नाशिक आणि नगर, मराठवाड्याची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरीत मोठ्या प्रमाणात पसरलेल्या पानवेलींनी श्‍वास कोंडला जात आहे. माडसांगवी ते नांदुरमध्यमेश्‍वर धरणापर्यंत जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीपात्रात ठिकठिकाणी पानवेली पसरल्या आहेत. त्यामुळे गोदावरी नदीवर हिरवा शालु लपेटल्याचे चित्र रणरणत्या उन्हात दिसत आहे.

याबाबत प्रशासनाकडून गोदावरी स्वच्छतेची मोहीम व्यापक स्वरुपात राबविली जाण्याची मागणी गोदाकाठ भागातील जनतेकडून केली जात आहे. दरम्यान, या प्रकाराकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. रामसर क्षेत्र असलेल्या नांदुरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात ठिकठिकाणी शेकडो प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळल्याचे चित्र असताना याची साधी दखल घेतली जात नाही. अनेक ठिकाणी पानवेली कुजल्या आहेत. (latest marathi news)

A vessel occupied by Panvelis in Nandur Madhyameshwar Dam.
Nashik Traffic Rules Break: वाहनांतून धोकादायकरित्या सामानाची वाहतूक! वाहतूक पोलिसांचे दूर्लक्ष; भीषण दूर्घटनेची शक्यता

पाण्याने रंग बदलला असून, दुर्गंधीही सुटली आहे. निफाड तहसीलपासून हाकेच्या अंतरावर गोदावरी नदीचे बॅकवॉटर कादवा नदीत येऊन तेथे देखील जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. थेट अधिकाऱ्यांच्या दाराजवळच जलपर्णीने विळखा घातल्याचे चित्र असताना याचे प्रशासनाला साधे सोयरसुतक नसावे.

निफाड येथील जागतिक दर्जाच्या पाणथळ क्षेत्रामध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना, मृत मासे आणि प्रदुषणामुळे पक्षी तसेच माणसांवर होणारा परिणाम याकडे कोणाचेच लक्ष नाही. नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या. मात्र, याप्रश्‍नी एकाही लोकप्रतिनिधीने चकार शब्दही काढला नाही, हे विशेष.

उन्हाळ्यात जलप्रदूषण, पावसाळ्यात महापूर

वाढत्या जलप्रदूषणामुळे गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पानवेलींची निर्मिती झाल्याने नांदूरमधमेश्‍वर धरण ते माडसांगवीपर्यंत पानवेलींचा विळखा गोदामाईला बसला आहे. या पानवेलींमुळे विशेषत: पावसाळ्यात गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना येणाऱ्या पुरामुळे सदरच्या पानवेली गोदावरीतील सायखेडा, करंजगाव येथील पुलांना अडकत असल्याने निफाड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन त्याचा ताण प्रशासनावर पडतो.

A vessel occupied by Panvelis in Nandur Madhyameshwar Dam.
Nashik Lok Sabha Constituency : मतदानाच्या वाढीव टक्क्याचा कल ‘महाविकास’कडे

नांदूरमध्यमेश्‍वर धरणामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाच गेटची निर्मिती करण्यात आली. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम न होता आजही पूरपरिस्थितीत पूर्ण गोदाघाट सापडत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात जलप्रदूषण आणि पावसाळ्यात महापूर अशा विचित्र परिस्थितीत निफाड तालुक्यातील गोदाकाठचे नागरिक सापडले आहेत.

"गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पानवेलींचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत पानवेली सडलेल्या आहेत. त्यामुळे मासे देखील मृत पडले. सर्वसामान्य गोदाकाठवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठ भागातील लोक एकत्र येऊन प्रहार संघटनेच्या वतीने याठिकाणी जनआंदोलन उभे करण्यात येईल." - दत्ता आरोटे, जिल्हाप्रमुख, प्रहार विद्यार्थी संघटना, नाशिक

"गोदावरीत पानवेलींचे आच्छादन निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम जनावरे, कुत्री तसेच इतरही प्राणी पानवेली चारा समजून जातात अन् पानवेलींमध्ये गुंतून जीवावर बेतत आहे. शिवाय जलचर प्रदुषित पाण्यामुळे मृत होण्याचे प्रकार घडत आहे." - प्रतिक रायते, शिंगवे

"गोदावरी नदीपात्रात दरवर्षी दूषित पाणी येऊन पानवेलींची वाढ होते. पाण्याचे प्रदुषण रोखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, दरवर्षी हा प्रश्‍न चिघळत ठेवला जातो. त्यामुळे आता न्यायालयात गोदावरी प्रदुषण रोखण्यासाठी दाद मागून गोदामाय निर्मळ करण्याचा लढा उभा करु." - ॲड. विजय मोगल, पर्यावरण अभ्यासक, कोठुरे

A vessel occupied by Panvelis in Nandur Madhyameshwar Dam.
Nashik News : विनाहेल्मेट चालकांना हेल्मेटचे वाटप; शहर वाहतूक शाखा-फिजिक्स क्लासचा संयुक्त उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.