Nashik News : देशाच्या राजधानीत दिल्लीत महाराष्ट्राचे ९८ वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. दिल्ली हा राष्ट्रीय मंच असला तरी तिथे होणाऱ्या कार्यक्रमांना आंतरराष्ट्रीय दर्जा आपोआप प्राप्त होतो. मराठी साहित्यिकांची ताकद दाखविण्याची संधी तब्बल ७० वर्षांनंतर महाराष्ट्राला मिळत असल्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत. मराठी भाषा अभिजात समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मे २०१३ पासून केंद्राकडे प्रस्ताव सुपूर्द केला. (Expectations of Marathi getting elite status raised )