Nashik Vegetable Rate Hike : भाजीपाल्याच्या चढत्या भावाने फोडला घाम; गृहिणींचे बजेट बिघडले

Nashik News : जून महिन्यात दडी मारुन बसलेल्या पावसाने जुलैचा पहिला आठवडा उलटूनही अपेक्षित पाऊस नाशिक शहरात झालेला दिसत नाही. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव चांगलेच कडाडले आहे.
Vegetables
Vegetables esakal
Updated on

Nashik News : जून महिन्यात दडी मारुन बसलेल्या पावसाने जुलैचा पहिला आठवडा उलटूनही अपेक्षित पाऊस नाशिक शहरात झालेला दिसत नाही. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव चांगलेच कडाडले आहे. आवक घटल्यामुळे पावसाच्या वातावरणातही भाजीपाल्याच्या किमती वाढत आहे. पाऊस लांबल्यामुळे किमतींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Nashik Vegetable Rate Hike)

यामुळे ढगाळ वातावरणातही भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीने चांगलाच घाम फोडला आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने किचनच बजेट बिघडले आहे. काही ठिकाणी तर किचनमधून भाजीपाला गायबच झाला आहे. त्याऐवजी डाळींना प्राधान्य दिल जात आहे. मात्र डाळींच्या ही किमती वाढल्यामुळे आता खावे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाढते तापमान व त्यात पाऊस उशिराचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर सुद्धा झाला. भाजीपाल्याच्या किंमतींनी गृहिणींना हैराण करून सोडले आहे. अक्षरशः भाजीपाल्याने सर्वसामान्यांचे तोंडचे पाणी पळवले आहे. उन्हाळ्यात काही प्रमाणात भाजीपाल्याची किमती काही प्रमाणात स्थिर होत्या. दरम्यान, सध्या टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे.

२५-३० रुपये किलो असलेला टोमॅटो सध्याच्या घडीस ८०-९० रुपये किलोने बाजारात विक्रीसाठी आहे. उष्मा आणि कमी पाऊस यामुळे भाजीपाला आणि फळांच्या पिकांवर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, जुलैत समाधानकारक पाऊस झाला तर भाजीपाल्याचे भाव कमी होऊ शकतात. सध्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अनेक भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (latest marathi news)

Vegetables
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

टोमॅटोच्या भावात सर्वाधिक वाढ

सध्या टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ दक्षिणेकडील राज्यांमध्ये झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे आणि मॉन्सूनचे उशिरा आगमन यामुळं भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. कडक उन्हामुळे भाजीपाला खराब होऊ लागला आहे. त्यामुळे भाववाढ होत आहे. येत्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्यास भाजीपाल्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

भाजीपाला प्रतिकिलो

भेंडी :१२०

गवार :१६०

मटर :२८०

वांगे : ८०

बटाटा : ४०

वाल :१६०

टोमॅटो: ८०

कांदे : ४०

Vegetables
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.