Nashik News : वसंत व्याख्यानमालेचा खर्च 50 लाखाच्या घरात; वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीकांत बेणी यांची माहिती

Nashik : लोकल ते ग्लोबल असे ध्येय ठेवून १०१ व्या वसंत व्याख्यानमालेसाठी ५० लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
President Shrikant Beni and other office bearers while speaking in the special general meeting of the spring lecture series.
President Shrikant Beni and other office bearers while speaking in the special general meeting of the spring lecture series.esakal
Updated on

Nashik News : लोकल ते ग्लोबल असे ध्येय ठेवून १०१ व्या वसंत व्याख्यानमालेसाठी ५० लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तत्पूर्वीच्या व्याख्यानमालेचा खर्च केवळ चार ते सहा लाख रुपये होता. साउंड सिस्टिम, व्यासपीठ, लाइव्ह व्हिडिओ, ग्रँड फिनाले यामुळे वसंत व्याख्यानमालेच्या खर्चात वाढ झाली असल्याचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले. (nashik expenditure for 101 vasant vyakhyanmala Series is expected to be 50 lakhs marathi news)

वसंत व्याख्यानमाला संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा (ता.११) व्याख्यानमाला समतानगर येथील सभागृहात अध्यक्ष श्रीकांत बेणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष उषा तांबे, कार्याध्यक्ष संगीता बाफणा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रसंगी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त हेमंत देवरे यांनी वाचून दाखविले. त्यानंतर खजिनदार अविनाश वाळुंज यांनी हिशेब पत्र सादर केले. नवीन आयकर नियमानुसार २०२४-२५ अंदाजपत्रक जुलै- ऑगस्ट महिन्याच्या होणाऱ्या सभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे तो मुद्दा तहकूब करण्यात आला.(latest marathi news)

President Shrikant Beni and other office bearers while speaking in the special general meeting of the spring lecture series.
Nashik News : घरपट्टीसाठी पाचशेहून आधीक प्रकरण प्रलंबित! 2 वर्षापासून नगरपरिषदेकडे तक्रारी करुनही उपेक्षाच

दरम्यान गोदा घाटावर होणाऱ्या गोदा आरतीमुळे व्याख्यानमालेत अडथळा होण्याची शक्यता असल्याने पदाधिकाऱ्यांनी विनंती करून आरतीची वेळ सव्वा सातच्या आत पूर्ण करण्याची विनंती संस्थेला केली होती व विनंती मंजूर केली असल्याचे श्री. बेणी यांनी सांगितले. विजय काकड यांनी आभार मानले.

आमीर हुसेन लोनची विशेष उपस्थिती

जम्मू-काश्मीरचा खेळाडू अमीर हुसेन लोन हा पॅरा क्रिकेटपटू आहे. एका अपघातात त्याने दोन्ही हात गमावले पण पायाने बॅटिंग आणि बॉलिंग करतो. त्याचा क्रिकेट खेळताना व्हिडिओ सोशलमीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर सचिन तेंडुलकरने तो व्हिडिओ शेअर केला. असा हा आमीर वसंत व्याख्यानमालेत उपस्थित राहून क्रिकेटचा अनुभव सर्वांसमोर मांडणार आहे.

President Shrikant Beni and other office bearers while speaking in the special general meeting of the spring lecture series.
Nashik ZP News : जि.प. शिक्षणाधिकारी पहिल्या घंटीला शाळेवर; अचानक शाळांना भेटी देऊन केली पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.