Summer Heat : शरीराला कूल ठेवणारे आरोग्यदायी ‘कुलर’; उन्हाळ्यात कैरी, चिंच गुळाचे पन्हे घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Summer Heat : शरीराला कूल ठेवणारे आरोग्यदायी ‘कुलर’; उन्हाळ्यात कैरी, चिंच गुळाचे पन्हे घेण्याचा तज्ज्ञांचा सल्लाउन्हाळा सुरू होताच बाजारात कच्ची कैरी, चिंचा, कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते.
aam panna
aam pannaesakal
Updated on

Summer Heat : शरीराला कूल ठेवणारे आरोग्यदायी ‘कुलर’; उन्हाळ्यात कैरी, चिंच गुळाचे पन्हे घेण्याचा तज्ज्ञांचा सल्लाउन्हाळा सुरू होताच बाजारात कच्ची कैरी, चिंचा, कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते. वाढत्या उन्हाच्या कडाक्याच्या उन्हाला तोंड देण्यासाठी शरीर आतून मजबूत आणि थंड राहणे आवश्यक असल्याने घरगुती कैरीचे आणि चिंच गुळाचे पन्हे आरोग्यदायी असल्याचे आहारतज्ज्ञ आवर्जून सांगतात. पन्हे हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. त्यातून उन्हामुळे शरीराची कमी झालेली ऊर्जा भरून काढण्याचे काम पन्हे करतात. (nashik Expert advice to take curry tamarind jaggery leaves in summer marathi news)

त्यासाठी कडक उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवणारे कुलर्स अर्थात पन्हे घेतलेच पाहिजे. उन्हाळ्यात भूक मंदावलेली असते. जेवणाची फार इच्छा होत नाही, पोटाला भर म्हणून आहार घेतला जाते. अशावेळी शाळा- कॉलेज, नोकरी- कामानिमित्त उन्हातान्हात फिरताना शरीरातील ऊर्जा कमी होऊन शरीराला ग्लानी येऊन एक प्रकारचा थकवा येतो. कोणतेही काम करण्याचा उत्साह राहत नाही.

अशावेळी काहीतरी गरम खाण्यापेक्षा थंड पिण्याची इच्छा होते. पावले आपोआप रसवंतीगृह, ताक, बर्फाचा गोळा, आइस्क्रीम, कुल्फी घेण्याकडे वळतात. याउलट कैरी आणि चिंच गुळाचे पन्हे शरीराला अधिक फायदेशीर ठरतात. शिवाय यू- ट्यूबवर पन्हे बनविण्याची असंख्य रेसिपी असल्याने प्रत्येकवेळी नवनवीन प्रयोग करून बघता येतात. भाजलेल्या कैरीचे पन्हे, उकडलेल्या कैरीचे पन्हे, चिंच गूळ भिजवून केलेले पन्हे असे अनेक प्रकार यूट्यूबवर सहज बघायला मिळतात.  (latest marathi news)

aam panna
Summer Heat : जळगावचे तापमान पोचले 42 अंशांवर; तापमानाची वाटचाल उच्चांकाकडे

बाजारात कैरीची आवक वाढल्याने लोणचे, मुरंबा त्याचबरोबर कैरीपासून विविध पदार्थ बनवता येत असल्याने गृहिणींचा कल कैरी, चिंचा खरेदीकडे वाढला आहे. पन्ह्यासारखे आरोग्यदायी पेय पिल्यामुळे शरीराला तरतरी येते. शिवाय दोन जेवणांच्यामध्ये शरीराला थंड ठेवणारे पेय अर्थात कुलर्स जास्त गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

''पन्हे पिल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. त्यामुळे उष्माघात होण्यापासून शरीराचा बचाव होतो. कच्च्या कैरीत फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ॲंटीऑक्सिडंट अधिक असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. विविध प्रकारचे पन्हे पिल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.''-डॉ. सचिन जोशी

aam panna
Summer Heat : जळगावचे तापमान पोचले 42 अंशांवर; तापमानाची वाटचाल उच्चांकाकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.