Nashik Monsoon Season: आला पावसाळा, तब्‍येत सांभाळा...! वैयक्‍तिक, सामाजिक स्वच्‍छतेवर भर देण्याचा तज्‍ज्ञांचा सल्‍ला

Monsoon Season : प्रखर सुर्यकिरणांचा सामना करताना उकाड्याने हैराण झालेल्‍या नाशिककरांना मॉन्‍सूनचे वेध लागले आहे.
monsoon diseases
monsoon diseasesesakal
Updated on

Nashik Monsoon Season : प्रखर सुर्यकिरणांचा सामना करताना उकाड्याने हैराण झालेल्‍या नाशिककरांना मॉन्‍सूनचे वेध लागले आहे. पावसाळा सुरु झालेला असताना, नभांतून बरसणाऱ्या या सरींचा आनंद घेण्यासाठी अनेक जण आतुर झालेले आहेत. पण ऋतुमान बदलत असताना आरोग्‍याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्‍यामुळे वैयक्‍तिक व सामाजिक स्‍वच्‍छतेवर भर देताना पावसाचा मनमुराद आनंद लुटण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. ( Experts advise emphasis on personal social hygiene during monsoon )

बऱ्याच वेळा ऋतुचक्रात झालेला बदल विविध आजारांना कारणीभूत ठरतो. याचे महत्त्वाचे कारण म्‍हणजे ऋतू बदलताना त्‍यानुसार जीवनशैलीत अनेक जण बदल करत नाहीत किंवा आवश्‍यक सावधगिरी बाळगत नाहीत. यंदा भरपूर पावसाचा अंदाज वर्तविलेला असताना पुढील साधारणतः चार महिने धो-धो पाऊस बरसणार आहे. पण रिमझिम सरींचा आनंद घेताना आरोग्‍याकडे केलेले दुर्लक्ष चांगलेच महाग पडू शकते, याचीही जाणीव ठेवण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होत आहे.

सामाजिक स्‍वच्‍छता महत्त्वाची

पावसाळ्यात डेंग्‍यू, मलेरिया, चिकनगुन्‍या यासारखे आजार बळावतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणांची स्‍वच्‍छता राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. याकरिता पाण्याचे डबके साचू नये, कचऱ्याचे योग्यरीत्या विघटन करावे. कचरा, टायर आदी घटक जाळून वायू प्रदूषण करू नये, असा सल्ला देखील दिला जात आहे.

''पावसाळ्याच्‍या दिवसांमध्ये आद्रता वाढत असल्‍याने संसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण बळावते. अशा परिस्थितीत विशेष सतर्कता बाळगावी. विशेषतः गरोदर महिला, ज्‍येष्ठ नागरिक, लहान मुलांच्‍या आरोग्‍याची खबरदारी घ्यावी. आरोग्‍यविषयक तक्रार जाणवल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा.''- डॉ. अनंत पवार, नोडल अधिकारी, जिल्‍हा रुग्‍णालय. (latest marathi news)

monsoon diseases
Monsoon Season : मिरगाचा मुहूर्त टळला, आता पाऊस आणखी एक आठवडा लांबणार? शेतकरी चिंतेत

''कुटुंब सुदृढ ठेवायचे असेल, तर कुटुंबातील महिला सुदृढ राहिली पाहिजे. त्‍यामुळे सदस्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेताना महिला वर्गाने आपल्‍या आरोग्‍याची काळजी घ्यावी. ऋतूतील बदलानुसार आहारात बदल करत पौष्टिक व सकस आहार घ्यावा. आरोग्‍य विषयक तक्रार जाणवल्‍यास स्‍वतःच्‍या पातळीवर उपचार न घेता डॉक्‍टरांच्‍या सल्‍यानुसार औषधोपचार करावा.''- डॉ. राजश्री पाटील अध्यक्षा, फॅमिली फिजिशियन्‍स असोसिएशन.

''पावसाळ्यात डेंगी, चिकनगुन्‍या, मलेरियाच्‍या रुग्‍णसंख्येत लक्षणीय वाढ होते. डेंगीचे डास दिवसा चावत असल्‍याने शासकीय, खासगी कार्यालयांभोवती, आवारात डबकी साचणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. रोगप्रतिकार शक्‍ती चांगली राहाण्यासाठी सुकामेवा, विविध फळांचे सेवन करावे. स्‍वच्‍छ व फिल्‍टर केलेले पाणी सेवन केल्‍याने आजार टाळता येऊ शकतात.''- डॉ. वैभव पाटील, संचालक, सनराईज हॉस्‍पिटल, शिवा क्‍लिनिक.

''वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकार शक्‍ती घटल्‍याने कर्करोग, मधुमेह यासह इतर दुर्धर आजाराच्‍या रुग्‍णांनी विशेष काळजी घ्यावी. शक्‍यतो पाणी उकळल्‍यानंतर गार करून प्‍यावे. पावसाळ्यात वारंवार सर्दी, खोकला होणाऱ्या, दम्‍याच्‍या रुग्‍णांनी पंपचे औषधे, गोळ्या योग्‍य वापर करावा. ढगाळ वातावरणात दम्‍याच्‍या रुग्‍णांना आद्रतेमुळे त्रास होण्याची शक्‍यता असल्‍याने सावधगिरी बाळगावी. थंडी घालविण्यासाठी टायर, कचरा जाळण्याचे टाळावे.''- डॉ. समीर चंद्रात्रे, माजी अध्यक्ष, आयएमए.

''गेल्‍या काही दिवसांपासून डेंगीच्‍या रुग्‍णसंख्येत वाढ होते आहे. डास कधीही कुठेही चावू शकतात. त्‍यामुळे बचावात्‍मक उपाययोजनांवर भर द्यावा. महापालिका प्रशासनातर्फे फवारणी केली जात असल्‍याने, त्‍यांना सहकार्य करावे. शक्‍यतो पावसात भिजण्याचे टाळत कोरडे राहण्याचा प्रयत्‍न करावा. दूषित पाणी टाळताना, सकस व पौष्टिक, गरम आहार घ्यावा.''- डॉ. समीर पेखळे, संचालक, सिटी केअर हॉस्‍पिटल सचिव, फॅमिली फिजिशियन असोसिएशन.

monsoon diseases
Monsoon Season: निसर्गातील घटकांचा अभ्यास सुरू करण्याचा ऋतू

सुदृढ आरोग्‍यासाठी करा या गोष्टी

- शिळे किंवा उघड्यावरील अन्नाचे सेवन करू नका

- सकस, पौष्टिक व सर्वसमावेशक आहार घ्यावा.

- स्‍वच्‍छ व शुद्ध पाणी प्‍यावे, दूषित पाणी टाळावे.

- पावसात भिजणे टाळावे, शक्‍य तितके कोरडे रहावे.

- सर्दी, खोकला, ताप जाणवल्‍यास डॉक्‍टरांच्‍या सल्ल्याने उपचार घ्यावा

- दुर्धर आजाराच्‍या रुग्‍णांनी विशेष खबरदारी घ्यावी.

- पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घ्यावी.

monsoon diseases
Monsoon Season : रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीला सुरुवात; कागल, करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात पेरण्यांना गती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.