Nashik Cyber Fraud : इडीकडून अटकेची भिती दाखवून 90 लाखांना गंडा; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

Latest Fraud Crime : ज्येष्ठ नागरिकाला मनी लॉडरिंगच्या नावाखाली इडी कडून अटकेची भिती दाखवून तब्बल ९० लाखांना गंडा घातला आहे.
crime
crimeesakal
Updated on

नाशिक : सायबर भामट्यांनी पुन्हा एका ज्येष्ठ नागरिकाला मनी लॉडरिंगच्या नावाखाली इडी (सक्तवसुली संचलनालय) कडून अटकेची भिती दाखवून तब्बल ९० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद गजानन कुलकर्णी (७०, रा. डिसुजा कॉलनी, कॉलेजरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना ९ ते १७ तारखेदरम्यान त्यांच्या मोबाईलवर व्हॉटसॲपद्वारे अज्ञात संशयितांनी संपर्क साधला. (Extorting 90 lakhs by showing fear of arrest from ED )

त्यावेळी संशयितांनी कुलकर्णी यांना, तुमच्या आधारकार्ड लिंकच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरून मनिलॉडरिंग झाल्याचे सांगितले. तसेच, आरबीआय, इडी, सेबीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत वारंवार संपर्क साधला. तसेच, याप्रकरणी आता ईडीकडून अटकेची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी तुमच्या बँक खात्याचे तपशिलही संशयितांनी घेतले.

या सार्या प्रकाराला घाबरून जाऊन कुलकर्णी यांनी बँकेची माहिती दिली. संशयित भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील ८९ लाख ६० हजारांची रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर सायबर पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे हे तपास करीत आहेत.

crime
Nashik Fraud Crime : काम न करता उपशिक्षकाने लाटले वेतन; रावळगाव इंग्लिश स्कूलमधील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.