Nashik News : अव्वाच्या सव्वा व्याज आकारून खंडणीस्वरुपात पैसे उकळणार्या व अवैधरित्या सावकारी करणारा खासगी सावकार वैभव देवरे यास जिल्हा न्यायालयाने सतर्श जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही केवळ तपास थंडावल्याने देवरे यास जामीन मंजूर झाल्याने पोलिसांवर नामुष्की ओढावली असून याबाबत नाराजी व्यक्त होते आहे. (Extortionist Vaibhav Deore granted conditional bail)
गेल्या एप्रिल महिन्यात वैभव देवरे याच्याविरोधात चार गुन्हे दाखल झाले होते. दहा ते पंधरा टक्के व्याजाने अवैधरित्या सावकारी करणार्या देवरे याने अनेकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करताना अनेकांची मालमत्ता, वाहने बळकावल्याच्या तक्रारी आहेत. चार गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी झाली.
तर, त्याच्या पत्नीसह नातलगांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने त्यांची अटक टळली. पोलिस तपासातून देवरे याच्याकडे गडगंज मालमत्ता आढळून आली. देवरेच्या घरझडतीत पंधरा बँक खात्यांची पुस्तके, एका व्यक्तीसह हॉटेलचे ५५ लाख रुपयांचे ‘बेअरर चेक’, चार कार, एक ट्रॅक्टर व चार दुचाकी तर, सटाण्यात फार्महाउस, पत्नीच्या नावे तीन फ्लॅट, एका गुन्ह्यातील महिला फिर्यादीकडून बळकावलेल्या दोन कारही पोलिसांनी जप्त केल्या. (latest marathi news)
संशयित देवरे याने नाशिक शहरासह ग्रामीण भागातही अनेकांना अवैध सावकारीतून लुट केली आहे. तसेच कर्जदारांशी अश्लील भाषेत संवाद साधल्याचे त्याचे ऑडिओही व्हायरल झाले होते. मात्र, गंभीर गुन्हे दाखल असूनही त्यास महिन्याभरात जामीन मंजूर झाल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
पोलिसांवर नामुष्की
संशयित देवरे याच्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात इंदिरानगर पोलिसांनी प्राप्तीकर विभाग आणि उपनिबंधक कार्यालयाकडे पत्रव्यवहार केले. परंतु त्याचा पाठपुरावा होऊ शकलेला नाही. त्यामुळे या विभागांकडून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई देवरे याच्याविरोधात झालेली नाही.
दुसरीकडे पोलिसांत गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल करूनही तपास मात्र थंडावला होता. त्याचाच फायदा घेत संशयितास जामीन मंजूर झाला तर त्याविरोधात ठोस बाजू मांडण्यात पोलीस अपयशी ठरले. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.