Nashik News : पती अंथरुणाला खिळलेला; पत्नीने आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल

Latest Marathi News : दिवसेंदिवस वाढता खर्च आणि आर्थिक विवंचनेमुळे २६ वर्षीय या विवाहितेने इंदिरानगर परिसरात राहत असलेल्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली
Death
Deathesakal
Updated on

नाशिक : विवाहनंतर काही महिन्यात अपघात झालेल्या पतीला अर्धांगवायु झाला. त्यामुळे तो अंथरुणावर खिळलेला असताना त्याच्या उपचारासाठी रोजगाराकरिता नाशिक गाठले. परंतु दिवसेंदिवस वाढता खर्च आणि आर्थिक विवंचनेमुळे अखेर २६ वर्षीय या विवाहितेने इंदिरानगर परिसरात राहत असलेल्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. (Nashik extreme step taken marathi news)

पूजा आनंद शिरसाठ (२६, रा. पांडवनगरी, इंदिरानगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती आनंद शिरसाठ यांचा काही महिन्यांपूर्वी भुसावळ (जि. जळगाव) अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांना अर्धांगवायूचाही झटका आला.

त्यामुळे ते अंथरुणालाच खिळून आहेत. परिणामी, पतीच्या वैद्यकीय उपचारासह उदरनिर्वाहाचीही जबाबदारी त्यांची पत्नी पूजा यांच्यावर आली. त्यासाठी पूजा यांनी आपल्या पतीला आजारपणातून बरे करण्यासाठी रोजगार करण्याकरिता भुसावळ येथून नाशिक गाठले. (Latest Marathi News)

Death
Nashik Crime : अंबडमधील खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप! तिघांची निर्दोष मुक्तता

गेल्या वर्षभरापासून त्या इंदिरानगरच्या पांडवनगरीमध्ये भाड्याच्या घरात राहत असून, डी-मार्ट शोरुममध्ये काम करीत होत्या. येथून मिळणाऱ्या वेतनातून त्या पती आनंदच्या उपचारासाठी पैसे पाठवित होत्या. तर उर्वरित पैशात स्वत:चाही उदरनिर्वाह करीत होत्या.

परंतु आर्थिक विवंचना असह्य झाल्याने अखेर पूजा यांनी टोकाचा निर्णय घेत बुधवारी (ता. २१) दुपारी राहत्या घरातील किचनमध्ये साडीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार किशोर खरोटे हे करीत आहेत.

Death
Akola Crime News: जन्मदात्यांवर कुऱ्हाडीचे घाव; आई जागीच ठार तर वडील गंभीर, धक्कादायक कारण आलं समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.