Nashik News : आयटी इंजिनिअर तरुणानी उचलले टोकाचे पाऊल

Nashik : आयटी इंजिनिअर असलेल्या युवकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मित गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
Rohit Waje
Rohit Wajeesakal
Updated on

Nashik News : नाशिक रोड भागातील विहीतगावजवळील सौभाग्यनगर येथील इमारतीवरून आयटी इंजिनिअर असलेल्या युवकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मित गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, उपनगर पोलिस शोध घेत आहे. रोहित भाऊसाहेब वाजे (२३), असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ( extreme step taken by young IT engineer in nashik road )

भगूर येथील श्री रेणुका माता मंदिराजवळील कासार मळा येथील राहणाऱ्या रोहित भाऊसाहेब वाजे (२३) हा युवक शनिवारी (ता. २०) सकाळी अकराच्या सुमारास भगूर वरून नाशिक रोडकडे येत असताना त्याने नाशिक रोड परिसरात असणाऱ्या देवळाली विहीतगावजवळील सौभाग्यनगर लॅम रोड येथील रेणुका गार्डन शेजारील नवीन होत असलेल्या अष्टप्रद हाईटस या इमारतीच्या खाली आपली दुचाकी लावली.

Rohit Waje
Nashik News : छोट्या शहरांच्या विविध पैलूंचा ‘नाशिक प्रोजेक्ट’ने केला उलगडा

त्यांनतर इमारतीवर गेला आणि पाचव्या मजल्यावरून खाली झोकून देत आत्महत्या केली. रोहित वाजे हा युवक आयटी इंजिनिअर असून, तो पुण्याच्या कंपनीमध्ये काम करीत होता. मात्र वर्क फ्रॉम होम या तत्त्वावर तो घरून काम करीत होता. त्याचे वडील भाऊसाहेब वाजे हे आर्टिलरी सेंटरमधील एमईएस विभागात काम करून सेवानिवृत्त झाले आहे.

त्याच्यामागे आईवडील व बहीण असा परिवार असून तो एकुलता एक असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनगर पोलिसात या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सदाशिव कोकाटे, पोलिस अंमलदार गणेश कुमावत करीत आहे.

Rohit Waje
Nashik News : अतिरिक्त आयुक्तांच्या तपासणीत स्वच्छता कर्मचारी चक्क गैरहजर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com