नाशिक : शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केल्या आहेत. यात एका इंजिनिअर तर एका कंपनीतील नोकरी गमावल्याने बेरोजगार युवकाचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. (Nashik Extreme steps taken marathi news)
गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमधील सुमीत दत्तात्रय निरगुड (३०, रा. साई रो हाऊस, दत्त मंदिरासमोर, ध्रुवनगर, गंगापूर शिवार) या युवकाने रविवारी (ता.१८) दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
सुमीत इंजिनिअर असून, सध्या बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हवालदार आर. के. चौधरी हे तपास करीत आहेत. तर, गंगापूर पोलिस ठाण्याच्याच हद्दीतील शिवाजीनगरमध्ये दुसरी आत्महत्या झाली. अनोज सूर्या मौर्या (२१, रा. रुक्मिणी अपार्टमेंट, होळकर चौक, शिवाजीनगर) याने रविवारी (ता. १८) रात्री आठ वाजेपूर्वी राहत्या घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
अनोज हा एका कंपनीत कामाला होता. परंतु त्यास कंपनीने ब्रेक दिला होता. त्यामुळे तो रोजगाराच्या विवंचनेत होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवालदार डी. डी. सरनाईक हे तपास करीत आहेत. या दोन्ही घटनांप्रकरणी गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.(Latest Marathi News)
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेवगे दारणा रोडवरील गोडसे चाळीत राहणाऱ्या विवाहितेने राहत्या घरात रविवारी (ता.१८) गळफास घेत आत्महत्या केली. सुनीता सुनील ठाकरे (२७) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मोलमजुरी करणारे ठाकरे दांपत्य असून, त्यांना दोन मुले आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नसून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
तर चौथी घटना सिडकोतील गणेश चौकात घडली. उमेश किशोर गायकवाड (२७, रा. औदुंबर स्टॉप, गणेश चौक, सिडको) याने रविवारी (ता.१८) सायंकाळी साडेपाच वाजेपूर्वी घरातील किरकोळ कारणावरून गळफास लावून घेत आत्महत्या केली.
पत्नी संध्या, लहान भाऊ रोहित यांनी दरवाजा तोडून बेशुद्ध उमेश यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.