Nashik : वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी उचलले टोकाचे पाऊल

Nashik : शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये तिघांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली असून यात एक २४ वर्षीय युवतीचाही समावेश आहे.
Suicide
SuicideESakal
Updated on

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये तिघांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली असून यात एक २४ वर्षीय युवतीचाही समावेश आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून, आत्महत्त्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. दीपक वसंत जाधव (रा. शक्ती रो हाऊस, श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. २५) सकाळी ते कामावर गेले. त्यावेळी त्यांची भाची प्रणाली संतोष पाळदे (२४) ही घराच होती. (Extreme steps taken by three in different incidents in city )

सायंकाळी पाचला ते घरी आले असता, आत प्रवेश केला त्यावेळी भाची प्रणाली हिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. तर दुसरी घटनाही श्रमिकनगरमध्येच घडली. मोहीत शांताराम पाटील (२५, रा. रामरेशभाई निवास, श्रमिकनगर, सातपूर) याने बुधवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास राहत्या घराच्या शेडच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. घरमालक भगवान खैरनार यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले.

Suicide
Nashik Accident : नांदगाला भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; 4 जण गंभीर जखमी...

याप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. तसेच, तिसरी घटना म्हसरुळ हद्दीत घडली. मयुर शिवाजी लगरे (३२, रा. रेणुका अपार्टमेंट, गजपंथ) यांनी बुधवारी (ता.२५) दुपारी एक वाजता राहत्या घराच्या ठिकाणी असलेल्या चिंचेच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. याप्रकरणी शिवाजी गोविंद लगरे यांच्या खबरीनुसार म्हसरुळ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. या तीनही आत्महत्त्यांमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Suicide
Nashik Accident : शिर्डी महामार्गावर अज्ञात वाहनाचा धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.