Ganesh Visarjan Miravnuk : मालेगावी अमाप उत्साहात ‘श्रीं’ ना निरोप; मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त

Visarjan Miravnuk : गणपतीचा जय जयकार’ आदी घोषणांबरोबरच गुलालाची उधळण करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.
Baby saying goodbye to beloved father.  Eye-catching procession of Ekta Mandal.
Baby saying goodbye to beloved father. Eye-catching procession of Ekta Mandal.esakal
Updated on

मालेगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक, दोन, तीन, चार... गणपतीचा जय जयकार’ आदी घोषणांबरोबरच गुलालाची उधळण करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. विविध मंडळांनी सवाद्य मिरवणुकीने रात्री उशिरापर्यंत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले. महादेव घाट गणेशकुंडावर पहाटे चारला भारत मंडळाच्या गणरायाचे, तर सोयगाव गणेश कुंडावर मॉर्निंग स्टार व्यायामशाळेच्या गणरायाचे पहाटे सव्वापाचला विसर्जन करण्यात आले. शहर व परिसरात उत्साहात व शांततेत विसर्जन सोहळा पार पडला. (Farewell was given to loved Ganaraya by throwing gulal)

यावर्षी गणेशोत्सवात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. अनंत चतुर्दशीच्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासूनच घरगुती गणपतीचे विविध गणेश कुंडांवर विसर्जन केले जात होते. रामसेतू पुलाजवळील पुरातन महादेव घाट गणेशकुंडावर बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचे विसर्जन झाले. यावर्षी मोठ्या मूर्ती असल्याने महादेव घाट विसर्जनासाठी अपुरा पडला. त्यामुळे काही मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन सोयगाव गणेशकुंडात करण्यात आले. शहर व परिसरातील लहान मंडळांच्या मिरवणुका दुपारी सुरु झाल्या.

प्रमुख मंडळांच्या श्री विसर्जन मिरवणुका सायंकाळी पाचनंतर सुरु झाल्या. येथील सटाणा नाक्यावरील एकता मंडळाची मिरवणूक लक्षवेधी होती. मिरवणुकीत सोळा वाहने, चौदा पथके व दीड हजारावर कलावंत सहभागी झाले होते. कलाकारांची कलाकृती पाहण्यासाठी सटाणा नाका, मोसम चौक, संगमेश्‍वर, रामसेतू पूल या मार्गावर जनसागर उसळला होता. कलावंतांच्या नेत्रदीपक कलेने मालेगावकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. (latest marathi news)

Baby saying goodbye to beloved father.  Eye-catching procession of Ekta Mandal.
Nashik Ganesh Visarjan Miravnuk : मुख्य विसर्जन मिरवणुकीत 21 मंडळांना परवानगी; मनपाचा मानाचा ‘श्रीं’ अग्रस्थानी

यावेळी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधीक्षक तेगबिरसिंह संधू तळ ठोकून होते. कुसुंबा रस्त्यावरील द्याने ते नवीन बसस्थानकापर्यंत तसेच मुख्य मिरवणूक मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त नुतन खाडे, उपायुक्त गणेश शिंदे आदींसह अधिकाऱ्यांनी विविध गणेशकुंडांना भेटी दिल्या.

शांतता समितीतर्फे मंडळांचे स्वागत

येथील कॅम्प व सोयगाव गणेश कुंडावर येथे मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. याखेरीज वाल्मिकनगर शाळा, सोयगाव अग्निशमन दलाजवळ, अंबिका कॉलनी, गोळीबार मैदान, चर्च गेटजवळ, भायगाव गणपती मंदिरजवळ, कलेक्टरपट्टा, द्याने, छत्रपती शिवाजी महाराज जिमखाना आदी तेरा ठिकाणी श्रींचे वाजतगाजत जल्लोषात विसर्जन करण्यात आले. कॅम्प, सटाणा नाका, सोयगाव, संगमेश्‍वर, द्याने, दरेगाव, भायगाव, टेहरे यासह शहरात गणरायाचे विसर्जन शांततेत झाले. द्याने भागातून येणाऱ्या मिरवणुकांचे शांतता समितीतर्फे करीम नाका येथे स्वागत करण्यात आले. शांतता समितीच्या सदस्यांनी मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत केले.

गणेश कुंडाचे नाव - विसर्जन मुर्ती - घरगुती - मंडळे

महादेव घाट गणेशकुंड - १८६० - १३९

कॅम्प गणेशकुंड - २४४५ - १०८

सोयगाव गणेशकुंड - ४४९४ - १२३

इतर तात्पुरते गणेशकुंड - १५०० - ००

Baby saying goodbye to beloved father.  Eye-catching procession of Ekta Mandal.
Nashik Ganesh Visarjan Miravnuk: आदेश झुगारून विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट; शांतता समितीच्या सदस्यांकडूनच आदेश पायदळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()