Nashik Rain News : पावसाच्या शिडकाव्याने पिकांना जीवदान; येवल्यात 15-20 दिवसानंतर दिलासा

Nashik Rain : तब्बल १५ ते २० दिवसानंतर रविवारी रात्री शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मंडळनिहाय कमी-अधिक प्रमाणात पाऊस असला तरी फक्त सरासरी १७ मिमी पाऊस पडला आहे.
The millet crop of Khandu Thorat here was washed away due to rain and wind.
The millet crop of Khandu Thorat here was washed away due to rain and wind.esakal
Updated on

Nashik Rain News : तब्बल १५ ते २० दिवसानंतर रविवारी रात्री शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मंडळनिहाय कमी-अधिक प्रमाणात पाऊस असला तरी फक्त सरासरी १७ मिमी पाऊस पडला आहे. हा शिडकावा असला तरी मरणासन्न पिकांची एक भरणी झाली असून, यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील २० दिवसांपासून थेंबभर पाऊस नसल्याने पूर्व भागातील करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पावसाने हसू पसरवले आहे. (farmer Relief after 20 days of arrival of rain in district )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.