Onion Purchase : कांदा खरेदी बाजार समितीतूनच करा!

Nashik News : नाफेडची खरेदी सुरू होऊन महिना उलटत आला तरीही पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी झालेला नसल्याचे आढळून आले.
Onion Purchase
Onion Purchaseesakal
Updated on

चांदवड : नाफेडच्या कांदा खरेदीप्रश्नी शेतकरी नाराज असून कांदा खरेदी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलेले नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांची भेट घेत नाफेडचे संचालक केदा आहेर आणि चांदवड बाजार समितीचे माजी सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी त्यांना नाफेडने बाजार समिती व्यतिरिक्त अन्यत्र कुठूनही कांदा खरेदी करू नये असे साकडे घातले. (farmers are upset with NAFED issue of onion purchase)

यातून भावात निर्माण होणारी तफावत दूर होऊन एकाच ठिकाणी खरेदीमुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि नाफेडचा हेतूही स्पष्ट होईल असे स्पष्ट केले. जेठाभाईंनी सर्व प्रश्न समजून घेत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे उभयतांनी सांगितले. श्री. जेठाभाई जेठाभाई अहिर यांनी गुरुवारी (ता.२०) नाशिक जिल्ह्यातील कांदा खेरदी केंद्रावर अचानक भेट दिली.

नाफेडच्या कांदा खरेदीची माहिती जाणून घेत त्यामध्ये असलेल्या त्रुटी समजून घेण्याकरिता आणि चुकीचे कामकाज करणाऱ्या फेडरेशन व संस्थांवर कारवाई करण्यासाठी ही त्यांची भेट होती. नाफेड कर्मचारी वर्ग पिंपळगाव शाखेला याबाबत कोणालाही माहिती न देता त्यांनी अचानक खरेदी केंद्रांना भेटी दिल्या व त्या ठिकाणी असलेल्या त्रुटी व कामकाजावर बोट ठेवले.

अधिकारी कर्मचारी वर्गाची झाडाझडती घेतली. नाफेडची खरेदी सुरू होऊन महिना उलटत आला तरीही पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी झालेला नसल्याचे आढळून आले. श्री. जेठाभाई शुक्रवारी (ता.२१) सकाळी नाशिकमध्ये आले. त्यानंतर नाफेडचे महाराष्ट्र व गुजरात झोनचे संचालक केदा आहेर व चांदवड बाजार समितीचे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे व शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली आणि मागण्यांचे निवेदनही दिले. (latest marathi news)

Onion Purchase
Nashik News : जिल्‍हा बँकेचे प्रशासक, सीईओंना ठार मारण्याची धमकी!

श्री. आहेर व डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले, की नाफेड अंतर्गत खरेदी करणाऱ्या सर्व सभासद संस्था, फेडरेशन व इतर काही संस्थांतर्फे जी कांदा खरेदी शेतकऱ्याच्या बांधावर किंवा सेंटरवर केली जाते, त्याऐवजी ती संपूर्ण खरेदी खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधून करावी, जेणेकरून त्या ठिकाणी स्पर्धा होईल.

शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील आणि ज्या उद्देशाने शासनाने ही खरेदी सुरू केलेली आहे तो उद्देशही सफल होईल. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे तत्काळ डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावेत, भविष्यात ही खरेदी सभासद संस्थांकडून व विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून (सोसायटी) गावोगावी खरेदी सुरू करावी ही मागणी केली.

नोंदणीचे निकष बदलावेत

दररोज जे कांदा खरेदीचे दर निश्चित केले जातात, ते सकाळी अकराच्या आत प्रकाशित करावे, जेणेकरून शेतकऱ्याला आपला शेतीमाल ट्रॅक्टरमध्ये भरून बाजार समितीत आणता येतो किंवा सेंटरवर खाली करता येतो. नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून आधारलिंक, ओटीपी घेतला जातो. बरेच शेतकरी वयस्कर शेतकरी आहेत.

Onion Purchase
Nashik Road Construction : पावसाळ्यातही एकेरीच वाहतूक राहणार; भावडबारी ते देवळा

त्यांना मोबाईल लिंक समजत नाही, शेतकरी ऑनलाइन फ्रॉडच्या भीतीने ओटीपी देण्यास तयार नसतो, त्यामुळेही शेतकरी नाफेडला कांदा देण्यास उत्सुक नाही. त्यामुळे आधारलिंक करण्याऐवजी फक्त मोबाईल नंबरचा ओटीपी घेऊन नोंदणी करावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे.

अधिकाऱ्यांची चौकशी करा

नाफेडच्या कांदा खरेदी विक्रीच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या स्तरावर समिती गठित करण्यात यावी व मागील दोन-तीन वर्षांमध्ये अधिकाऱ्यांमार्फत झालेल्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

"शासनाने नाफेड व एनसीसीएफमार्फत सुरू केलेली कांदा खरेदी योजना शेतकऱ्यांसाठीच आहे, परंतु या योजनेची व खरेदी केंद्राची माहिती शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांची शासनाबाबत नाराजी आहे, ती नाराजी दूर करण्यासाठी शासनाने नाफेड व एनसीसीफमार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करावी. त्यामुळे खरेदीदारांत स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून चार पैसे जास्त मिळतील, त्यासाठी वाणिज्य विभाग भारत सरकार व नाफेडच्या संचालक मंडळाने यावर विचार करावा." - डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी सभापती, चांदवड बाजार समिती

Onion Purchase
Nashik News : चणकापूर पूरपाण्याचा मुद्दा ठरणार कळीचा; दुष्काळाने होरपळलेले देवळावासीय आक्रमक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com