Crop Insurance : पिकविम्यातून नाशिकला 656 कोटी; प्रत्यक्ष खात्यावर वर्ग होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Crop Insurance : खरीप हंगामात झालेल्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने १९२७ कोटी रुपये पीकविमा कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
Crop Insurance
Crop Insuranceesakal
Updated on

नाशिक : दुष्काळामुळे गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने १९२७ कोटी रुपये पीकविमा कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६५६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचे वितरण कधी सुरु होणार याविषयी शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे. राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना लागू केल्यामुळे गेल्या वर्षी जिल्ह्यातील पाच लाख ८० हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग गेला. (Farmers are waiting for 656 crore from crop insurance to be transferred to direct account )

त्याच हंगामात भीषण दुष्काळ पडल्याने खरिपाची सर्व पिके वाया गेली. शेतकऱ्यांचे नुकसान झाले, पण भरपाई मिळत नसल्याने पीकविमा कंपनीविषयी नाराजी निर्माण झाली. पीकविमा कंपनी व राज्य शासन यांनी समन्वयातून तोडगा काढला आहे. ११० टक्क्यांपर्यंतची भरपाई संबंधित पीकविमा कंपनी देईल आणि त्यापेक्षा अधिक नुकसान झालेले असल्यास राज्य शासन त्याची पुर्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील नऊ पीकविमा कंपन्यांना एकत्रितपणे १९२७.५२ कोटी रुपये वर्ग करण्याचे आदेश सोमवारी (ता.३०) जारी केले. त्यानुसार जिल्ह्यातील ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत जिल्ह्यात ६५६ कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. (latest marathi news)

Crop Insurance
Nashik Crop Insurance : एक रुपयांत पिकविम्यासाठी बांधावर जनजागृती; भाजप किसान मोर्चाचा पुढाकार

जिल्हानिहाय मिळणारी भरपाई (कोटी रुपये)

नाशिक-६५६

जळगाव-४७०

अहमदनगर-७१३

सोलापूर-२.६६

सातारा-२७.७३

चंद्रपूर-५८.९०

Crop Insurance
Nashik Crop Insurance : खरिपात 4 लाख हेक्टरलाच विम्याचे कवच! जिल्ह्यातील पिकांना 1 हजार 827 कोटींचे संरक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.