Nashik News : ठिबक सिंचनाच्या 25 कोटींच्या अनुदानापासून शेतकरी वंचित; आंदोलनाचा इशारा

Nashik : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत तुषार व ठिबक सिंचन योजनेतील साडेआठ हजार शेतकऱ्यांचे २५ कोटींचे अनुदान थकले आहे.
Farmers in discussion with District Deputy Director of Agriculture Jagdish Patil.
Farmers in discussion with District Deputy Director of Agriculture Jagdish Patil.esakal
Updated on

Nashik News : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत तुषार व ठिबक सिंचन योजनेतील साडेआठ हजार शेतकऱ्यांचे २५ कोटींचे अनुदान थकले आहे. ते त्वरित न मिळाल्यास थेट कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा जय किसान फार्मर्स फोरमने दिला आहे. चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ५) फोरमच्या माध्यमातून जिल्हा उपसंचालक जगदीश पाटील व जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनानुसार २०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे २५ कोटींचे अनुदान रखडले आहे. ते कधी मिळणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ( Farmers deprived of 25 crore subsidy for drip irrigation )

शेतकऱ्यांना ऑगस्टअखेर अनुदान न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर यांनी दिला. शेतकऱ्यांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड करण्यात आल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित होणे अपेक्षित असताना ते अद्याप झालेले नाही. हे अनुदान केंद्र व राज्य शासन वितरित करते. मात्र, काही महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ‘ब्रेक’ लागला आहे. जिल्ह्यातील जवळपास साडेआठ हजार शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला असून, अजून हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. (latest marathi news)

Farmers in discussion with District Deputy Director of Agriculture Jagdish Patil.
Nashik News : मविप्रच्या अडीच लाख विद्यार्थ्यांची सर्वेशसाठी प्रार्थना; उद्याच्‍या पात्रता फेरीचे मविप्रच्या शाखांमध्ये थेट प्रक्षेपण

या अनुदानासाठी कृषी विभागाने कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. आता आचारसंहिता संपल्याने कृषी विभागाने पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. संजय जाधव, रमेश तिडके, शशिकांत तिडके, अरविंद भंदुरे, राहुल काकड, संजय गाडगे, भरत भोर, सुरेश बच्छाव, गोविंदा महाले, रामभाऊ न्याहारकर, दिलीप गायकवाड, प्रकाश सोनवणे, प्रमोद पालवे, शिवाजी न्याहारकर, अजिंक्य देसमुख, सिंधूबाई परदेशी, राकेश शिंदे, हेमंत पवार, सुरेश काकड, कविता पवार, सुमन आहेर, माधवराव पवार, केवळ पवार, शांताराम गुंजाळ आदी उपस्थित होते.

Farmers in discussion with District Deputy Director of Agriculture Jagdish Patil.
Nashik News : पशू, कुक्कुटखाद्याची होणार तपासणी; बोगसगिरीला बसणार आळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.